हुतात्मा दिन
30 जानेवारी हा दरवर्षी “हुतात्मा दिन” म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी सन 1948 मध्ये महात्मा गांधीची हत्या करण्यात आली होती. यानिमित्ताने आपल्याला जवानांचे हौतात्म्य आणि पराक्रम यांची आठवण होते असेही म्हणता येईल. पुढील पिढीसाठी ही आठवण ठेवणे आवश्यक आहे. देशाची सेवा करताना हौतात्म्य येणे हे प्रत्येक जवानाचे स्वप्न असते. 26 जानेवारीला दरवर्षी सैंन्यातील हुतात्म्यांना सन्मानीत करण्यात येते. खरेतर हा प्रसंग भावनाप्रधान असतो त्यांच्या कुटूंबियांच्या दृष्टिने गौरवास्पद असतो.
एक आसाम रेजिमेंटचे गाजलेले गाणे आहे. “बल्लूराम का बदन जमी के निचे है!, तो हमे उसका रेशन मिलता है!” या गाण्याचा इतिहास असा आहे की बल्लूराम नावाचा जवान जपान विरूध्दच्या लढाईत शहीद होतो. त्याची नोंद न झाल्यामूळे त्याचे रेशन येणे चालू रहाते. काही दिवसानी त्यांच्या फलटणीला लढाईमूळे रेशनपाणी बंद होते. त्यांच्या जवळ
बल्लूरामच्या वाट्याचे अन्नधान्य इतरांच्या उपयोगास येते. एकूण हा जवान शहीद झाल्यानंतर सुद्धा फलटणीतल्या जवानांचे भले करुन जातो. तीच गोष्ट प्रकाशात न आलेल्या हजारो क्रांतीकारकांची आणि जवानांची ज्यांच्या बलीदानाची कथा व व्यथा जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहचत नाही. असे अनेक अनाम वीर व विरांगना आहेत ज्यांनी स्वातंत्रपूर्व चळवळीत सक्रीय सहभाग घेऊन आयुष्याची व कुटूंबाची होळी करून अनामिक राहिले. त्यांच्यासाठी “नाही चिरा नाही पणती”. याव्यतिरिक्त
रामायणातील उर्मिला, सावरकर बंधूच्या बायका, कमला नेहरू, इंदिरा गांधीचे पती सारख्या कणखर स्त्रीच्या
मागे ठामपणे उभे राहिलेले प्रसिध्दी न पावलेले अशा अनेक स्त्री-पुरूषांचे आपण
स्मरणसुद्धा करीत नाही, ते अनामिक राहतात. स्त्रीची भूमिकापण
अप्रत्यक्षपणे हौतात्म्य पत्करल्यासारखी असते एकदा लग्न झाल्यानंतर तीचे कोणी वाली नसायचे. एक
प्रकारे मन मारून कधी स्वत:साठी तर कधी कुटूंबातील इतरांसाठी स्वेच्छेने तर कधी
जबरदस्तीने.
कर्तव्य बजावतांना मरण आले अशा अनेक अनाम विरांना सादर प्रणाम!
Comments
Post a Comment