संकल्प - २०२१

. संकल्प - २०२१

               इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस. नवीन संकल्पाबाबत नुकतेच एका भाषणात सांगितले की खूपजण याचा आनंद साजरा करतात, एकमेकांना भेटतात, पार्टी आयोजित केल्या जातात. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन नवीन संकल्प आखतात. ह्यावर्षी जमले नाही ते पुढच्या वर्षी करू असे छातीठोकपणे म्हणतात आणि दुसऱ्याच दिवशी विसरून जातात. काहीतरी कारणे मिळतात. अशी कित्येक वर्षे जातात पण संकल्प करणे सोडत नाहीत आणि विसरणेपण. करोनाने जरी 9 महिने आयुष्य थांबल्यासारखे वाटत होते. काही चांगल्या गोष्टीपण घडल्या. मी मराठी सर्वधन मंडळामध्ये सामील झाले. माझे छोटे छोटे लेख शनिवार रविवारी  येत असल्याने तेवढा वेळ लिखाणासाठी काढायला लागले. नवीन नवीन विषय सुचायला लागलेरेडिओवर कोकणीतून लेख वाचून झाले. असा एकूण या वर्षीचा म.सा.वी. चा (महत्तम साधारण विभाजक)  चांगला आहे बहुतेक. आणखीन काय हवे आपणास ?

            हेतुपुरस्सर जर  एखादा संकल्प केला असेल तर नक्कीच तडीस नेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी लागणारी जिद्द, मेहनत, नियमितपणा कुठेतरी कमी पडतो असे मला वाटते. 10-15 वर्षापूर्वी असाच एक संकल्प केला होता की रोज एक पान लिहायचेयाला अपवाद असेल काही दिवसांचा. तरीही आज माझे एवढे लेखन जमा झाले की आता त्याचे मागच्या वर्षी पुस्तक छापण्यासाठी गेले पण म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्नें तसे! करोना प्रकट झाला आणि गुढीपाडव्यानिमित्त प्रकाशित होणारे पुस्तक छापून झाले नाही.  शेवटी कंटाळून मी यावर्षी गुढीपाडव्यानिमित्त   “ई-पुस्तक”  काढायचे ठरविले.

           दुसरा यावर्षीचा संकल्प, व्हॉटसअपवर” मराठी आणि कोकणीतून लिहिण्याचा बोलण्याचा. अर्थात ज्यांना कळते त्यांनाच हो! तेवढेच मायबोलीचे ऋण फेडण्यासाठी खारीचा वाटा.  तुम्ही काय काय केलेत संकल्पनसतील केले तर आता तरी करा आणि त्यांची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करा. गंमतीचा भाग सोडला तरी त्यानिमित्ताने आपण थोडेसे बांधील राहतो. अध्यात्मातसंकल्प केला तरच सिद्धी प्राप्त होतेअसे म्हणतातनाहीतर आपली विसरण्याची आणि वेळ चुकवण्याची सवय कायम रहाते. हे संकल्प जाहीररित्या सांगितले तर लोकांना चिडवायला बरे आणि त्यांनी चिडवू नये म्हणून तरी तडीस नेणे महत्वाचे. वर्षाच्या सुरवातीस 2-3 तरी किमान संकल्प असावेत म्हणजे 1 किंवा 2 संकल्प तरी पूर्ण करायचे प्रयत्न  होतात.


           माझा तिसरा संकल्प कॅसिओ रोज वाजविणे असा आहे जो मी सध्या आठवड्यातून एकदा वाजवते. बघू कसे काय जमते ते पुढच्या डिसेंबर पर्यंत किती झाले आणि किती राहिले याची कबुली स्वत:च स्वत:ला द्यावयाची आहे

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव