घराचा वर्धापनदिन

                   17 एप्रिल 2003 माझ्या घराचा वाढदिवस. 18 वर्षें झाली या घरात राहून. वाढदिवस म्हणजे गृह प्रवेष त्यादिवशी झाला म्हणून. 2 वर्षे आधी बांधकाम पूर्ण झाले असेल म्हणजे एकूण 20 वर्षे झालीत या घराला. आतापर्यंत प्राणी पक्षी, मोठी माणसे, मुले यांचा वाढदिवस साजरा करत होतो, आता आणखीन एकाची भरनिर्जीव वस्तूंचा कधी वाढदिवस करतात का? पण घराला निर्जिव कसे म्हणणार? आपल्या धर्मात त्याला वास्तुपुरुष असे म्हणतात आणि ते खरेही असावे. त्यामागे किती जणांचे हित (आर्थिक, सामाजिक, भावनिक, मानसिक) जपलेली असतात. राहणाऱ्या माणसाला तर त्याच्या घराबद्दल आपुलकी तयार होते. आपल्या सूख-दु:खाचा हा एकमेव मूक साक्षिदार असतो.  गावात याच्या नावाने दक्षिण दिशेला मुद्दाम किंवा तुळशीकडे दिवा लावतात. हा दिवा येणाऱ्या जाणा-याला वाट दाखवतो आणि घराचे रक्षणही करतो असे म्हणतात. तसेच काहीजण दरवाजावर कोहळा, नारळ, किंवा कोल्हापुरी छोटी चप्पल दर्शनी भागावर टांगतात, कारण घराला कुणाची वाईट नजर लागू नये म्हणून.

            फेंगशुईनुसार बरेच जण या गोष्टींचा विचार करून घराची दिशा, सजावट, बांधणीसुद्धा बदलतात. आपले वास्तुशास्त्र प्रगत समजले जातेप्रत्येकजण आपल्या घराच्या ओढीने का होईना घरी परतत असतो. बाहेरच्या कोलाहलात कुटूंबासोबत रहाण्यासाठी, उदर निर्वाहासाठी आणि विश्रांती घ्यावी म्हणून तो या घराकडे हक्काने बघत असतो. प्रसंगी घरासाठी कर्ज काढून स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा वाड-वडिलांची संपत्ती म्हणून काहीजण आपल्या वास्तूला खूप प्रयत्नपूर्वक जपत असतात.

            घराची वेळच्या वेळी स्वच्छता, आटोपशीर सामान आणि हसत खेळत राहणारी माणसे हा प्रत्येक घराचा आत्मा असतो.  अशा या घराचा वाढदिवस साजरा करणे म्हणजे काही विशेष नाही. त्याच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणे एवढेच. ती तुम्ही कशी करायची ते व्यक्तीसापेक्ष असू शकते. काहीजण दरवर्षी पूजा करतात. सण-समारंभ असला की घराला सजवणे, रंग काढणे, दुरुस्ती करणें अशा अनेक गोष्टी असतात. पूर्वी असे म्हणायचे, घरात वाईट कधी बोलू नये, वादविवाद घालू नये, वास्तू  “तथास्तु"  म्हणत असतेखरं आहे ते,  आपण आळशीपणा केला की घरपण निस्तेज वाटतं.  तेच जर सगळे लोक आनंदाने राहत असतील तर घर हसेल. शेवटी या गोष्टी आपण मानण्यावर अवलंबून असतात

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव