टॉनिक (उर्जा)

 


           कोणतेही टॉनिक घेतले की, गेलेली शक्ती पुन्हा येते असे पुर्वी म्हणत होते. आमच्या लहानपणी मुलांना द्राक्षासव देत असत आता वेगवेगळ्या विटामिन्सच्या गोळ्या देतात. उदा कॅल्शीयम, आर्यन, व्हिटेमिन सी किंवा डी वगैरे.  कमतरता भरून काढण्यासाठी हा तात्पुरता आधार असतो. आपले चौरस आहार वेळच्यावेळी घेणे ही खरे  आवश्यक आहे.

          लहानपणी “टॉनिक” नावाचे मासिक येत असे. मुलांना आवडणारे लेख, गोष्टी कविता, विनोद, खेळ आणि बरीच काही माहिती असायची. महिनाभर ते पुरायचे. मुलांच्या मानसिक वाढीसाठी आवश्यक असे. मुलांबरोबर मोठ्यांनाही वेळ काढावा लागायचा कारण वाचून दाखवून अर्थ सांगण्यासाठी,  अशी एकूण मजा असे.

            असे टॉनिक वेगवेगळ्याप्रकारे मोठ्यांनी घेणे आवश्यक असते. जेणेकरून जगण्यातला एकसूरीपणा, कंटाळा आणि येणारा मानसिक थकवा घालविण्यासाठी हे टॉनिक कसे, केव्हा व कुठे घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. प्रत्येकाची आवड-निवड, स्वभाव, विचार करायची पध्दत वेगवेगळी असू शकते.  थोडक्यात शाररिक कमतरता डॉक्टरला सांगून भरून काढू शकता  मनाला उत्तेजन देण्यासाठी खालीलप्रमाणे कोणतेही एक किंवा अनेक टॉनिक घेणे आवश्यक असते.

1.     चांगल्या लोकांच्या सहवासात

2.     निसर्गाच्या सानिध्यात

3.     मित्रांच्या संगतीत

4.     आवडत्या छंदात

5.      आवडत्या खेळात

6.      निरागस किंवा खळखळून हसणे

           कोणतीही गोष्ट, साधी फुले बघितली, थोडा वेळ मुलांबरोबर खेळलो तरी मन प्रफूल्लीत होते. एखादी मनासारखी गोष्ट घडली तरी मन प्रसन्न होते.  काही जणांना प्राणी, पक्षी, मासे पाळणे आवडते. बायकांना तर छोट्या छोट्या गोष्टीतून टॉनिक मिळत असते. एकत्र सगळेजण बसून जेवणे, थट्टा-मस्करी करणे, खाताना पदार्थाची स्तुती करणे, मुलांनी न सांगता मदत करणे. नव-याने खरेदीस परवानगी देणे,  ही यादी मोठी आहे. म्हणूनच शेवटी असे म्हणावेसे वाटते “गंध नको दु:खाचा ... सुर सुखाचा राहू दे .. हसतमुख चेहरा नेहमी असाच राहूदे.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव