अर्धांगिनी

            “अर्धांगिनीलापत्नी हा शब्द अगदी सौम्य वाटतो. संसाररुपी नाटकातील सर्वात शक्तीशाली पात्र असून तिचे असणे यावर तिचा नवरा अस्तित्वात येतो.  त्याच बरोबर इतर अनेक पात्रे नावारुपास येतात. नव-याला बायकोपेक्षा जास्त कोणी जपू शकत नाही. त्याचे सगळे गुणदोष पोटात घालून सर्वस्वी साथ देणारी ती अर्धांगिनी. पुराणातसुद्धा सती सावित्री, अनुसूया, मंदोदरी, सिता यांच्या महान पतिव्रता म्हणून उल्लेख आढळतो. ज्यांच्यामूळे गेलेले प्राण, वैभव परत मिळालेअर्धांगीनी संसारात मार्गदर्शकाची भुमिका बजावत असते. त्यामुळे ती कोणत्याही संकटावर मात करू शकते. 

           काही वर्षांनी नवरा-बायको एवढे एकमेकांमध्ये एकरूप होतात की त्यांचे एकमेकांशिवाय अस्तित्व उरत नाही.  सगळी माहेरची नाती सोडून ती नव-या सोबत येते आणि शेवटच्या श्वासापर्यंत नव-याची साथ देते.  पत्नी म्हणजे अनेक नात्यांचे भांडार आहे. सेवा आणि प्रेम ती आई बनून करते. पित्याप्रमाणे घराचे हित साधत असते. झालेल्या चुकांवर पती व मुलांना रागवायचेपण अधिकार असतात. सल्लामसलत किंवा वादविवाद करते तेव्हा ती मित्रासारखी वागते. जेव्हा सगळ्या जगाला विसरून (मूलांनासुद्धा)           नव-याच्या मिठीत जाते तेव्हा ती प्रेमिका असते.  आपले सर्वस्व पतीच्या अधीन करते.  अशा पत्नीला योग्य तो मान दिला पाहिजे.

             पत्नीचे मन जाणून घेतले पाहिजे, तिच्या काही रास्त मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे. आता तिचे क्षितीज आणखी रुंदावले आहे. पुर्वी घर आणि मूले सांभाळणे एवढेच मर्यादित होते तर आता ती अर्थाजनासाठी घराचा उंबरठा, देश आणि समाजही ओलांडू लागली आहे. त्यामुळे जशी तिच्या जबाबदारीत वाढ झाली आहे तशीच पुरूषांचीसुद्धा तिला समजून घेण्याची जबाबदारी वाढलेली आहे. सजग पिता, पती, मित्र आणि प्रसंगी तिचा मार्गदर्शक अशा अनेक भुमिका त्याच्याही वाढलेल्या आहेत.

           अर्धनारी नटेश्वराचा पुतळा हेच दर्शवतो की दोघांनाही परस्पर पुरक घडवलेले आहे.  त्यामुळे हे सत्य स्विकारुन अर्धांगिनीचे महत्व सर्व पुरूषांना कळावयास हवे.  हे कळायला वेळ लागतो आणि जेव्हा कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असतेअर्धांगिनीचे ऋण कधीच फेडता येत नाही. अगदी 21व्या शतकात पत्नीची जागा कोणी घेऊ शकत नाही. काय पाहिजे तुला असे कोणी विचारले तर प्रत्येक नव-याने “माझ्या अर्धांगिनीला खुष ठेव” असा वर मागावा म्हणजे आपोआप सर्व काही मिळेल.  ही जाणीव प्रत्येक मुलाला लहानपणीच करून देण्यात यावी असे वाटते.   

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव