डाव एक बुद्धिचा

                श्री. विश्वनाथन आनंद हा भारताला बुद्धिबळात अजिंक्यपदे मिळवून देणारा पहिला भारतीय ठरला. माझ्या शासकीय कार्यालयातून एका अंध भगिनींने बुद्धिबळ खेळून या खेळाचा नावलौकिक वाढविला. खाडीलकर, ठिपसे या महिलांनी  "हम भी कुछ कम नही" हे सिद्ध करून दाखविलेच आहे. असा हा असामान्य खेळ माणसाला अंतर्मुख करायला भाग तर पाडतोच त्याबरोबर तासनतास जागेवर बसवून ठेवतो. लहानपणीपासून लग्न होईपर्यंत भाऊ, आईबरोबर खेळायला मला खूप आवडत असे व नंतर नोकरी, मुलींमुळे कित्येक वर्षांपासून या खेळाला हातच लावला नव्हता. काही वर्षाने मुली जेव्हा मोठया झाल्या तेव्हा पुन्हा हा खेळ सुरू झाला.

             शारिरीक खेळ सगळयाना खेळणे शक्य नसते. परंतु हा खेळ  अगदी पिकनिकला, फिरावयास गेलो तरी घेऊन जाता येते. या खेळाचे मॅगनिटिक पट मिळतात त्यामुळे सोंगटया हरवण्याची भिती नाही. पुर्वीच्या राजे सरदार लोकांना या खेळाचे खूप आकर्षण असायचे. मान आणि मैत्री दाखविणे अशा उददे्शाने हा खेळ खेळला जायचा. मुत्सदेगिरी आणि कावेबाजपणा हे या खेळाचे दोन घटक असतात आणि पुर्वी खेळताना राजनैतिक मनसुबेपण आखले जायचे. विशेष म्हणजे या खेळात राजापेक्षा राणीची जास्त हुकमत चालते आणि कित्येकजण राणी मारल्यावर खेळ सोडून देतात.

        वैयक्तिक जीवनात बुद्धिबळाचे स्थान महत्वाचे आहे. कधी ४ पाऊले पुढे तर परिस्थितीनुसार माघार घेण्याची तयारी करणे. समोरच्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणें आपले धोरण ठरविणे. संभाव्य धोके लक्षात घेऊन आपण सर्व कामे मार्गी लागतील अशी तयारी करणे. शत्रूला बेसावध ठेऊन अचानक चाल बदलणे. अशी अनेक तंत्र या खेळातून शिकायला मिळतात म्हणून हा खेळ मला खूप आवडतो. प्रत्येक सोंगट्याची चाल वेगळी, अधिकार वेगळे आणि मर्यादा वेगळ्या. 64 घरांचा हा खेळ जीवनात बरेच काही शिकवून जातो.

          बघा, तुम्हीसुद्धा खेळून आनंद मिळेल. तेवढाच आजच्या यांत्रिक युगात बुद्धिला सलाम!

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव