अडथळ्यांची शर्यत
“आपल्या ध्येयावरची
नजर थोडी जरी हलली
लगेच अडीअडचणी भेडसावतात”.
- हेंर्नी फोर्ड
सहजसाध्य असे कोणतंच काम नसते. काम पूर्ण होईपर्यत काही ना काहीं अडचणी, अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल हे समजणारे फार कमी लोक असतात.
जेव्हां यश मिळेल तेव्हा जो आनंद होईल तो वेगळाच असतो. काही अडथळे प्रगतीवर मात करतात तर कधी कधीं काही अडथळ्यांमुळे प्रगती खुंटते.
वैयक्तिक जीवनातील अनुभवामुळे किंवा इतरांच्या मार्गदर्शनामुळे आपण त्यातून मार्ग काढू शकतो. त्यातून आपलीं मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या परीक्षेनुसार फळ मिळेल यावर आपला विश्वास हवा. मग नक्कीच यश मिळेल. लहान मुलेसुद्धा पहिल्यांदा धडपडूनच चालायला शिकतात. एडिसनला बल्बचा शोध लावण्याच्या आधी १०० वेळा अपयश आले होते म्हणून जर त्यांनी प्रयत्नं सोडुन दिले असते तर! साध्या मुंगीचा जीव केवढा आणि ती करत असेलेले कष्ट आपल्याला खूप काहीं शिकवीत असतात. बेभान गाडी चालवू नये म्हणुन जसे
गतिरोधक असतात तसेच वैयक्तिक आयुष्यातसुद्धा कधी कधीं अडथळ्यांची आवश्यकता असते.
या अडथळ्यांमुळे निराश न होता त्याचा सकारात्मकतेने विचार केल्यास नक्कीच यश मिळेल. श्रध्दा आणि सबुरी ठेवल्यास प्रत्येक अडथळे
दुर करणे सहज शक्य होते. त्यासाठी हार न मानता आपण सतत प्रयत्न करीत राहिले
पाहिजे. “प्रयत्ने वाळू रगडीता तेलही गळे” ही म्हण हेच दर्शविते. तसेही विनाअडथळा
कोणतेही काम झाले तर कधी कधी आपलाच विश्वास बसत नाही तर कधी अतिविश्वास घातक ठरतो.
Comments
Post a Comment