कौतुकाची थाप

           मध्यंतरी “Whatsup” वर एक संदेश आला होता, ज्याचा मतितार्थ असा होता की, बायकांना कौतुकाचे वावडे असते. खरंय, फार कमी बायका किंवा एखादी अपवाद असावी की जी कौतुकाने दुस-यांची स्तुती करते. काय कारण असेल? एक तर तिचे कोणी कौतुक (आई-वडील, भाऊ, बहिण) केलेले नसावे किंवा तिला अशी भिती वाटत असावी की, आपण कौतुक केले आणि समोरचा डोक्यावर बसला तर! पण कौतुकाची थाप ही प्रत्येकाची मानसिक गरज आहे.  निरनिराळ्या पातळीवर त्याला /तिला कौतुक आवश्यक असते. तेच जर नसेल तर प्रोत्साहन कसे मिळणार? रोज रोज नाही कधीतरी कौतुकाची थाप आई-वडिलांनी द्यावी अशी मुलांची अपेक्षा असते.  नव-याकडून बायकोची आणि बायकोकडून नव-याचीसुद्धा,  कामगाराची मालकाकडून किंवा साहेबांची त्याच्यां कर्मचा-यांना असणे हे काही चुकीचे नाही. त्यामुळे दोन कौतुकाचे शब्ददेखील खूप काही बदल घडवू शकतात. अनावश्यक कौतुक  टाळावे. योग्य वेळी कौतुकाची थाप ही लवकर यशस्वी होण्यासाठीची गुरूकिल्ली आहे. ती कुठे, कधी आणि केव्हा द्यायची हे ज्याला कळले तो सर्वात यशस्वी माणूस असावा असे वाटते.

            अशी ही कौतुकाची थाप कधी बोलून, वागून, आर्थिक बक्षीस, प्रोत्साहन योजना राबवून किंवा पदोन्नतीच्या दर्जा देऊन, अशा वेगवेगळ्या प्रकारे देता येऊ शकते. घरात बोलणे, वागणे, वेगवेगळ्या त-हेचे आमिष दाखवून जर लगेच शाबासकी दिली तर मुलांच्या, कामगारांच्या, अधिका-यांच्या कामात व वागणूकीत सकारात्मक फरक पडेल.

               पाठीवर कौतुकाची थाप असेल तर काम करण्यात मजा वाटते. गृहिणीची तीच व्यथा असते.  तिच्या कामाची पोचपावती मुले आणि नवरा वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतात. व हे वेळच्यावेळी करणे आवश्यक असते. अन्यथा कित्येक मानसिक / शारिरीक आजारपण उदभवतात.  कौतुक केल्यामूळे आणखी एक फायदा होतो, माणसे पटकन जोडली जातात, नाती टिकतात आणि आपलेपणा निर्माण होतो

                असे म्हणतात की, लहानांचे नेहमी कौतूक करावे म्हणजे मुलांना हुरूप येऊन आणखी आवडीने काम होते.  न होणारे कामपण प्रोत्साहनपर शब्दांनी ते काम करायचे धाडस प्राप्त होते.  मग काय होणार ना कौतुकाचे धनीकरणार ना दुस-यांचे कौतुक?

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव