आयुष्याचे गणित

लहानपणी गणित शिकताना गणितातली गृहितके (Equations) सांगितली जावयाची त्याची मजा वाटायची. कधीकधी प्रश्न पडायचे हे असे का? त्यामुळे गणिताशी सख्य असे कधी झाले नाही. आता नौकरीत  अनेक आकडेवारी सहज आपण सादर करतो. संगणकामूळे सगळे काही सोपे झालेत्याआधी गणकयंत्र मदतीला होते. त्याच्याही आधी पाढे पाठ करणे हे गणित येण्यासाठी आवश्यक असायचे. पुढे  कॉमर्स घेतल्यामूळे गणिताशी जवळचा संबंध आला, आता तर पर्यायच नाही. जो विषय शाळेत शिकणा-यांना अवघड वाटतो तो विषय अशिक्षित लोक  पटकन सोडवतात. भाजीवाला, दुधवाला, किराणा दुकानदार, सोनार आणि इतर व्यावसायिक तोंडी हिशेब पटकन करून आपल्याला सांगतात.

             गणित प्रत्येक क्षेत्रात आहे. आपल्या शरिरात श्वास, ठोके, हाडे, रक्त प्रमाण हे ठराविक गतीत, प्रमाणात चालतात. त्यांचे पण एक गणित असते. ते डॉक्टर सोडवतात. संगितात लय, मात्रा स्वर यांचे पण गणित असते. कोणतीही कला प्रमाणबध्दच असते. (आधुनिक कला वगळता) साधा शिंपीसुद्धा कपडे कापताना हिशेबाने कापतो. यंत्राना गती देताना जो वेग ठरविला जातो. त्याच्यातही गणितच असते. आयुष्याचे गणित सोडविणे हे एक आव्हानच असते.

           जेव्हा आपला जन्म होतो तेव्हाच आपले ठोके, श्वास आयुष्य निश्चित करून पाठविले असते. फक्त आपल्याला  ते कळत नसतेआपण अनेक आडाखे बांधत असतोवरच्याचे गणित वेगळेच असते. कुणाला अधिक, वजा, भागाकार आणि गुणाकार करायचे हे देखिल परिस्थितीनुसार आपोआप ठरत जाते.

            हातचा एक राखून ठेवलेला असतो. तो कधी कुणाच्या रुपाने मिळेल ते ही आपल्याला माहित नसते. आपण फक्तनियतीच्या हातातले बाहुले”. कधी कुणाला, कुठे कसे आणि केवढे नाचवायचे ते ही विधाता ठरवणार आपण फक्त प्रयत्न करायचे. नात्यांचा गुणाकार, वाईट लोकांचा भागाकार, प्रेमाची बेरीज, षडरिपूंची वजाबाकी हे गणित ज्याला जमले, त्याला जीवन कळले असे म्हणावयास हरकत नाही. 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव