काळजी करणे

                  लहान मोठ्या घटनेने अनेक जण खूप चिंता करीत असतात. छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घ्यायचा आणि इतरांनाही द्यायचा असा काही जणांचा स्थायी भाव असतो. खरेतर चिंता करण्यामूळे विचारांची गती थांबविण्याचा प्रयत्न करतो. एक गुंता तयार होतो आणि आपण केलेल्या गुंत्यात अडकत जातो. परिणामी अनेक रोगांना आमंत्रण देतो.

                 विशेषत:  मुलांच्या भवितव्याबद्दल, पैशाबद्दल, नातेसंबधाबद्दल काहीजण खूप चिंता करतात. बरं एवढी चिंता करूनही काही मार्ग निघतो का? तर नाही, त्याऐवजी आपल्या मनात सकारात्मक विचार, “चांगलेच होणार सगळेअसे सारखे बजावत राहीलो तर कदाचित ही चिंता आपोआप मनातच विरघळून जाईल. चिंता करण्यामूळे जे होणार ते टाळू तर शकत नाही. मग उगीच चिंता करण्यापेक्षा आलेल्या संकटांचा सामना कसा करता येईल, हा विचार केला तर आपोआप मार्ग ही सुचत जातील आणि मनही हलके     होईल. चिंता करण्यामूळे आपले आरोग्य, नातेसंबंध तर बिघडतात. जेव्हा लोकांना कळते की अमुक व्यक्ती नुसती चिंता व्यक्त करण्यापलीकडे काही करत नाही, मग लोक शक्यतो अशा व्यक्तींना (स्वभाव तसा असल्याने) टाळतात किंवा काही गोष्टी त्यांच्या पर्यंत पोचवतच नाहीत.

                 दैंनंदिन जीवनात कधी ना कधी अनियमितता होणारच. ही अनियमितता कधी अपरिहार्य असते तर कधी आपण योग्य ती काळजी घेतल्यास टाळू शकतो. नेहमीच सगळे सुरळीत चालेल अगदी निर्धास्त राहू असे कसे म्हणता येईल आणि अपेक्षा तरी का असावी ?  उलट त्यातल्या त्यात आपण सक्षम आहोत, आपल्याकडे साधने आहेत, शिक्षण आहे, तेव्हा या सगळ्याचा वापर करून योग्य पर्याय शोधल्यास चिंता कमी होतील. कधी कधी काळ हाच एक उपाय असतो.

          आकस्मिक घटना घडल्यास चिंता वाटणे स्वाभाविक आहे. त्यावेळी त्या घटनेची नकारात्मकता आपल्या मनावर पडू न देता पुढे काय करता येईल यावर उपाय शोधल्यास चिंता कमी होऊ शकते. समस्या आहेत तेथे उपाय असतातफक्त आपण डोळे उघडे ठेऊन आणि शांत मनाने विचार केल्यास काहीतरी मार्ग निघू शकतो तशी मानसिक तयारी हवी आणि मन खंबीर हवे. यासाठी आपल्या पुर्वजांनी समाधानी वृत्ती जोपासावी असे सांगितले. योगा, वेळच्यावेळी खाणे / झोपणे, अधिकचा हव्यास सोडून शांततेत जीवन जगावे.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव