जेष्ठ एक आधारवड
दुरदर्शनवरील “गंगाधर टिपरे” ही मालिका त्याकाळी खुप गाजली होती. आताची “अग बाई सासूबाई” ही मालिकासुध्दा दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. या दोन्ही मालिका सुन आणि सासरे यांच्या नात्यावर आधारित आणि त्यांचे सूत कसे जमते ते लक्षात घेण्यासारखे आहे. ख-या आयुष्यातसुद्धा सुन आणि सासरे हे एकमेकांना समजून घेणारे असतात हा माझा स्वानुभव आहे.
मागे एक नाटक पाहिले होते “प्रेमाच्या
गावा जावे” त्यातसुद्धा 3 पिढींचा एकत्र प्रवास हसत-खेळत मांडलेला आहे.
म्हातारपण खरेतरं दुसरे बालपण म्हणतात. या बालपणाचा आधार दुस-या पिढीला मार्गदर्शक आणि तिस-या पिढीला सहायक ठरु शकतो. नातवंडामध्ये आणि आजी-आजोबांचे एक वेगळेच सूत जमते.
पहिल्या आणि दुस-या पिढीचे आपआपसात जेवढे जमणार नाही तेवढे पहिल्या आणि तिस-या पिढीचे नक्कीच जमते. काही अपवाद असतात पण बहुतेक वेळा जमतेच.
घराला घरपण
आणि कौटुंबिक स्वाथ्य
जपायचे असल्यास संयुक्त कुटूंबाची खरी गरज आता आहे कारण आई-बाबा आणि समाज माध्यमे,
टिव्ही, संगणक, मोबाईल यांच्या घोळक्यात नातवंडे आपले बालपण कधी हरवतात ते कळत
नाही. तेच जर आजी-आजोबांबरोबर सुर जुळल्यास या आभासी जगाचे मुलांना आकर्षण वाटणार नाही आणि वेगळ्या
संस्कारवर्गाची गरज भासणार नाही.
जेष्ठांनीसुद्धा काही खबरदारी घेतल्यास विशेषत: स्त्रियांनी मुलांच्या
संसारात लुडबूड करणे टाळावे. अवास्तव अपेक्षा ठेऊन सारखा पाणउतारा
करू नये. तसेच त्यांच्यावरील
संस्कारित आयुष्य नकळतच आपल्यासह तिस-या पिढीकडे संक्रमित होऊ शकते. अडीअडचणींना कसे
तोंड द्यायचे याचे मार्गदर्शन कळत नकळत मिळते. ज्येष्ठांचा अनुभव, कौशल्याचा आणि सामायिक जबाबदा-या
निभावल्या तर हा आधारवड एक सातत्याने छान सावली देऊ शकतो.
Comments
Post a Comment