मी एक “फुलवॉ”

 मी एक फूल आहे. धरतीचे मूल आहे.

छोटेसे का होईना माझे अस्तित्व आहे. किर्ती माझी महान आहे.

 स्वत: फुलायचे, इतरांना फुलवायचे, सुगंध पसरावयाचा.

 इतरांचे आयुष्यात दरवळायाचे. कुठे मी फुलणार?

कोणाकडे जाणार? देवावर, शेजेवर, केसावर कि जवानांच्या अंत्ययात्रेत?

हातात, प्रेमात कि दु:खात, सगळीकडे सारखेच कर्त्यव्य  बजवायचे !,

झोपाळ्यावाचून झुलायचे, इतरांना डोलवायचे.

 हे करता करता एक दिवस त्या निसर्ग चरणी लीन व्हायचे.

.        माझी पहिली कविता वाचून मन हेलावले ना!  फुले असतात तशी. मन प्रसन्न करणारी. निसर्गाशी जवळीक साधून आपले अस्तित्व सिध्द करणारी, ऋतूंची भागीदारी, नैसर्गिकरित्या खंबीर तशीच नाजूक आणि छोटे पण सुगंधित आयुष्य साजरे करणारी,

            अशी ही फुले सगळ्यांनाच आवडतात. लहानपणापासून फुलांची मला खूप आवड  होती. फुलपूडीतले केवडा, काकडा, शेवंती, गुलाब, मोगरा ही  फुले  एकतरी वेणीवर माळल्याशिवाय शाळेत क्वचित जाणे व्हायचे. तेव्हा केस लांब होते आणि दोन जाड डबल वेण्या मग काय मजाच मजा. मैत्रिणीपण मुद्दाम माझ्यासाठी आठवणीने त्यांच्या बागेतील फुलांचा गजरा करून आणून द्यायच्या. गेले ते दिवस. कॉलेजपर्यंत ही आवड जोपासली. नंतरकालाय तस्मे नम:!” आता ना एवढे लांब केस राहीले ना आवड जोपासयाला सवड राहिलीती उणीव  मी दुस-यांकडे जाताना, कुणाचे अभिनंदन करताना, कुणाचा वाढदिवस / निवृत्ती / सत्कार  या प्रसंगी आठवणीने फुले देवून भरून काढते.

            आता ही आवड जोपासण्यासाठीइकेबानामाझ्या मदतीला धाऊन आला. “इकेबानाही कला जपानी असून त्यात फुलांचे निरनिराळ्या प्रकारच्या रचना केल्या जातात. त्यासाठी लागणारी फुले, साहित्य, इकेबाना क्लासेस आणि पुस्तके यांचा अभ्यास केल्यावर माझ्या एक लक्षात आले की, व्यावसायिकरित्या ही कला जोपासता येऊ शकते. सृजनशिलता, उपलब्ध फुले त्यांना एक आकर्षक रुप देऊन त्याची विशिष्ट सजावट करणे हे मला खूप आवडायला लागले. इतरांनासुध्द्दा याचा आनंद मिळू लागला. म्हणजे बघा, एक छोटेसे फूल काय काय आणि कसे कसे आपले मन रमवित असते शेवटपर्यंत.

           बाय वे, “फुलवॉहे नाव माझ्या मैत्रिणीने मला ठेवले होते. स्वत: अल्पायुशी ठरून फुलाप्रमाणे आमच्या जीवनात सुगंध पसरवून अनंतात विलीन झाली

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव