स्त्रिया आणि विनोद

              सर्वसाधारणपणे असा गैरसमज असतो की स्त्रियांना विनोदाचे वावडे असते.  अनेक विनोद स्त्रियांवर जास्त प्रमाणात असतात. सामाजिक माध्यमावरसुद्धा 99% विनोद स्त्रियांवर केलेले असतात. विशेष म्हणजे स्त्रियांच हे विनोद अग्रेषित (Forward) करत असतात. संस्कार, अंधानुकरण, शो ऑफ, त्यागमूर्ती, अबला वगैरे टायटल घेऊन ब-याच स्त्रिया स्वत:ला हुतात्मा बनण्याच्या प्रयत्नात असतात. मग त्यांना स्वत:साठी किंवा विनोदासाठी वेळ कुठे मिळतो.      

              पुर्वीआवाजव इतर काही मासिकांमध्ये प्रामुख्याने स्त्रियांवर व्यंगचित्रे, विनोद, टिंगल आणि खिल्ली उडवलेली असायचीतीच गोष्ट एका सिनेमाच्या गाण्यातमेरे अंगने मे तेरा क्या काम हैया गाण्यावर एका प्रसिध्द अभिनेत्याने स्वत: गाऊन त्यावर नृत्य केलेले आहे. रोज सकाळी हे गाणे रेडीओवर एकदा तरी लागतेच. मग कोणती समानता व स्त्रियांना मान मिळतोखरे नसते ते, गंभीरपणे घेऊ नका असा काही जण शहाजोग सल्ला देतील. मग एखादे असे गाणे पुरूषांवर का लिहिले गेले नाही,  लिहीणारे पुरूषच असणार ना?

          काही जण मित्र -मैत्रिणींमध्ये मूड असेल तेव्हा स्वत:हून चेष्टा मस्करी करण्यात भाग घेतात परंतू त्यासाठी ओळख, आपुलकी आणि हक्काची जाणीव असेल तेव्हाच. इतरत्र ती आदर्श सुन, बायको, आई, सासू अशा भूमिकेत वावरत असल्यामूळे तिच्यातील खेळकरपणा लयास जात असावा.


             बायका विनोदात का मागे पडतात कारण एकतर तिला टाईमपास करण्यास वेळ मिळत नसतो आणि आजूबाजूस एवढ्या समस्या बघून हसणे येत नसावे. आजची सक्षम स्त्री फालतू विनोदाचा का विषय बनते? केवळ तिच्याइझी गोइंगया वृत्तीला विरोध केल्यामूळे असावे. तरी एकत्र जमल्यावर काही प्रमाणात हास्य विनोद करायचा ती थोडा प्रयत्न करते. परंतू घरी आणि कार्यालयात नेहमी शक्य होत नाही. तेव्हा ती गंभीर आहे अशी वाटते. छोट्या छोट्या गोष्टींचापण तिला आनंद होत असतोतिच्या जीवनात आरोग्याच्या दृष्टीने  हास्य फुलविणे आवश्यक असतेकधीतरी हा विचार मनात आणून मुलांनी व नव-याने हे काम मनावर घ्यावे हीच इच्छामहिला दिनी”  आहे.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव