आरोग्यम धनसंपदा
लहानपणी "शुभंकरोती" म्हणताना अर्थ
कळत नव्हता, जेव्हा कळायला लागले तेव्हा नियमितपणे आरोग्याची काळजी घ्यावी लागते हे कळले. आपण एवढे बिझी असतो आणि आरोग्याची किंमत पैशापेक्षा मोठी असते ते कळत नाही. जेव्हा कळते तेव्हा वेळ निघूनही गेलेली असते.
सकस व नियमितपणे आहाराची शरीराला गरज असते. आपण हल्ली वेळ नाही म्हणुन घराबाहेर वावरताना कसेही आणि काहीही खातों त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. एकीकडे आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानामूळे वेगवेगळे औषधोपचार तयार होत आहेत तर दुसरीकडे नवनवीन आजारांना आपण आमंत्रण देत असतो. बरं, सगळयाना सगळी औषध मानवतीलच असे नाही. मग पुन्हा त्याच्या वेगळे ताणतणावांना सामोरे जावे लागते. यासाठी लागणारा वेळ आणि संयम
ठेवणे आवश्यक असते. रोज थोडासा स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही.
बहुत करून स्त्रिया दुखणे अंगावर काढतात. नाईलाज झाल्यावरच डॉक्टर गाठतात. कधी कधी तो पर्यंत उशीर झालेला असतो. म्हणून घरच्या घरी का होईना थोडासा व्यायाम, आराम, वेळच्या वेळी खाणे, घरगूती उपाय, नियमित तपासणी केल्यास मोठे आजार आपण टाळू शकतो. आजारामूळे होणारे नुकसान हे दुहेरी असते, स्वास्थ आणि पैसा. कुटूंबाचा आरोग्य विमा काढणे
आणि वार्षिक शारिरीक स्वास्थ तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
एका अभ्यासानुसार आरोग्याच्या दृष्टीकोनातून सर्वसाधारणपणे माणूस सप्ताहात 40 तास काम करू शकतो. त्यापेक्षा जास्त काम केल्यास
आरोग्यावर परिणाम होवू शकतो. तसेच आपले शरीरालासुद्धा 1 दिवस आराम देणे आवश्यक आहे. शरीर एक यंत्र आहे, त्यामुळे त्याला देखभालीची गरज असते.
Comments
Post a Comment