कॉफी आणि बरंच काही
माझ्या माहेरी मी कॉफी पित होते. त्यामुळे मला कॉफी खूप आवडते. माझ्या आवडत्या पेयात कॉफीचा समावेश करायला मला नक्की आवडेल. लहानपणी मला “मद्रासी कॉफीचे” खूप कुतूहल वाटायचे. दोन एकात एक छोटी भांडी, एकाच्या आत एक आणि मग अलगद हात न भाजता छोट्या भांड्यातून उघडून प्यायची. मजा यायची. आता कुठेशी दिसत नाही. तोपर्यत नेस कॅफे, ब्रु कॉफीचा जन्म झाला नव्हता. जी मजा कॉफी बरोबर केक खाण्यात यायची ती आताच्या बरिस्ता मध्ये बसून कॉफी पिण्यात येत नाही.
लग्न झाल्यानंतर मात्र सासरी चहा प्यावा लागला. कारण इथे सासरी कॉफी कोणी पितच नव्हतें. नवरोजी तर चुकूनही कॉफी पीत नाही.
मग मला सासरी माझ्या आवडीवर पाणी सोडावे लागले (लग्नाचा परिणाम). याची थोडी भरपाई म्हणून मी ऑफिसमध्ये किंवा हॉटेलमध्ये कॉफी पीत असते. हल्लीं ब-याच गोष्टींवर चर्चा कॉफी डे म्हणजे (सी.सी.डी.) मध्ये होत असतात म्हणे. तिथे तासन् तास बसायला परवानगी दिली जाते त्यामुळे ब-याच मिटिंग, अभ्यास आणि अनेक जण एकमेकांस भेटत असतात. एक अविभाज्य घटक म्हणून ही जागा लोकप्रियतेचे प्रतीक समजली जाते. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कॉफी आरोग्यासाठी हितकारक नाही तरी काही मर्यादित प्रमाणात पिण्यास हरकत नसावी असे वाटते.
कॉफी हे एक पेय आहे. कॉफी हे जगभर खप असलेले, तरतरी आणणारे, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय आहे. कॉफी पावडर बनवण्या साठी कॉफी बीन्स भाजून बारीक करतात. कॉफी मूळची आफ्रिकेतील असून, इराणींनी कॉफी मुंबईत आणली.
अनेक आक्रमणात कॉफीने आपल्यावर आक्रमण केलें आणि जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला. कॉफी अनेक प्रकाराची असते. मुलींच्या राज्यात मात्र माझे कॉफीचे लाड पुरविले जातात. त्यांच्यामुळेच मला कॉफीचे अनेक प्रकार चाखता आले. लॉकडाऊनच्या कालावधीत घर बसल्या अनेक प्रयोग कॉफीवर केले त्यातील काही पुढीलप्रमाणे:-
1.
एस्प्रेसो- याला बनविण्यासाठी कड़क ब्लैक कॉफ़ीला एक एस्प्रेसो मशीन मध्ये वाफेवर गरम खोल शेकलेल्या, खमंग भाजलेल्या सुगंधित कॉफ़ीच्या दाण्यातून काढून तयार केले जाते. याच्या तळाशी सोनेरी-भूरकट क्रीम चे (झाग) असतात.
2.
कैपेचीनो- गरम दूध आणि दूधाची
क्रीम सम समान प्रमाणात घेऊन बनते. कैफ़ै लैट्टे मध्ये एक भाग
एस्प्रेसोचा एक शॉट आणि तीन भाग गरम दूध असते.
3.
कॉफी फ़्रैपी- ठंडी एस्प्रेसो असते
ज्याला बर्फ़ाबरोबर एक लांब ग्लासात दिले जाते आणि यात दूधपण मिसळता
येते.
4.
दक्षिण भारतीय फ़िल्टर कॉफ़ीला याच्या अगोदर
एक पारंपरिक धातुच्या कॉफ़ी फ़िल्टरमध्ये कॉफी तासनतास थेंब थेंब पाडून तयार केली जाते.
5.
ब्लैक कॉफ़ी थेंब थेंब पाडून तयार केलेली गाळलेली
किंवा फ़्रेंच प्रेस शैलीतील कॉफ़ी आहे जी दूध न मिसळता दिली जाते.
6.
आइस्ड कॉफीमध्ये सामान्य कॉफीला बर्फाबरोबर तर कधी कधी दूध आणि साखर मिसळून कॉफी पुराण येथे समाप्त करूया.
Comments
Post a Comment