बचत होणार कशी?
वेगवेगळ्या प्रकारची बचत कधीतरी भविष्यात उपयोगी पडेल म्हणून केली जाते. प्रत्येकजणच आपाआपल्या परीने बचतीची योजना आखत असतो/ते. त्यात महिला पण आपत्कालीन
कांही ना काही गोष्टी आवर्जून बाजुला ठेवतच असतात. पैसे, सोने, जमीन आणि इतर अनेक गोष्टीमध्यें माणूस गुंतवणुकीस प्राधान्य देत असतो.
माझी एक मैत्रिण तर सगळे खर्च करायच्या आधी आजारपणासाठी मुददा्म पैसे वेगळे काढून ठेवतेच. उदयाचा विचार करूनच थोड़ी काटकसर आज करणे ही सवय जर लहानपणापासुनच लावली तर बचतीचे महत्व कळते. पाश्चात्य संस्कृती बचत वगैरेंचा विचार अजिबात करत नाही. त्यांना आजचा दिवस महत्वाचा वाटतो. त्यामुळें त्यांना भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गरीबांच्या बरोबरीने श्रीमंतांनासुद्धा बचत करावी लागते. बचतीचा उपयोग छत्री सारखा करावा असे आम्हाला कॉलेजात शिकवले होते. उन आणि पावसात या छत्रीचा उपयोग अन्य वेळी छत्री बंद
असते त्या दरम्यान या गंगाजळी (बचत) इतरांच्या उपयोगी पडतात. याच उद्देशाने बॅंका, विमा कंपन्या, म्युचल फंड किंवा ठेवी कार्यरत असतात.
वेगवेगळ्या प्रकारचे योजनेतील गुंतवणूक ही कधीं कधीं फायदेशीर ठरते तर कधी काळानुसार नुक़सानपण होते. याचा काहीं जण खूप धसका घेतात. काही वाईट करुन बसतात मग!
लग्न, घर,
मुलांचे शिक्षण, आजारपण, सेवानिवृत्तीनंतर अशा अनेक ठिकाणी ही बचत ऊपयोगी पडते. मानसिकरीत्या ही आपण गुंतवणुकीवर भर देतो. नातेवाईक, मित्र, सहकारी, शेजारी इत्यादींमध्ये सर्व प्रकारच्या भूमिका साकारत असतो, त्यामागचा हेतू आणिबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडावी हा असावा. हो
ना!
Comments
Post a Comment