संस्कृत भाषा
संस्कृत भाषा ही सगळ्या भाषेची जननी समजली जाते. संस्कृत भाषेमधून सगळ्या भाषेचा उगम होतो. शाळेत असताना हा विषय 50 मार्काचा होता. भाषा समृध्दीसाठी संस्कृतची माहिती असणे आवश्यक आहे. उपमा, अलंकार व म्हणी यामूळे भाषा आणखी सुंदर बनते. संस्कृत सुभाषिते खूप प्रसिध्द आहेत. संस्कृत भाषा परदेशातसुद्धा प्रसिध्द आहे. काही जण मुद्द्दाम संस्कृत शिकतात. आपल्या भाषेचा प्रत्येकाला अभिमान असतो. प्राचीन वेद, धर्मग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. कालिदासाने संस्कृत मधून लिहीलेले काव्य व साहित्य प्रसिध्द आहे. सुभाषितांमूळे भाषेची गोडी आणखीनच वाढते. अर्थपूर्ण भाषण किंवा जुने लेख, गोष्टी, ऐतिहासिक पुरावे व शिलालेख हे संस्कृतमध्ये असल्यामूळे अजूनही जपून ठेवले जातात. खणखणीत आवाज व स्पष्ट उच्चार असलेल्यांना ही भाषा नेहमी खुणावत असते. दैनंदिन जीवनात मंत्र, स्त्रोत्र, देशभक्तीपर गाणी ही संस्कृत भाषेत सवयीने सहज म्हणत असतो. उदा. वंदे मातरम, मंत्र पुष्पांजली, सरस्वती वंदन, जयोस्तुते. रोज संध्याकाळी म्हणणा-या परवच्या, शुभंकरोती इत्यादी.
आमचे संस्कृत शिक्षक छान शिकवायचे त्यामुळे पैकीच्या पैकी गुण मिळायचे. अजूनही हा विषय माझ्या आवडीचा आहे. भाषा म्हणजे व्यक्त होण्याचे साधन. मग ती कोणतीही असू दे. मातृभाषा व्यक्त होण्यासाठी जास्त जवळची वाटते. पुर्वीच्या काळी संस्कृत भाषा ही काही ठराविक लोकांची मक्तेदारी होती. परंतू काही संतानी, समाजसुधारकांनी सर्वसामान्यांना कळेल अशा स्थानिक भाषेत भाषांतर केल्यामूळे रुपांतरीत भाषेचे सौदंर्य
आणखी खुलले अशा मूळ भाषेचे म्हणजेच संस्कृत भाषेचे संवर्धन करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
परकीय भाषेचे आक्रमण आणि शब्दांची सरमिसळ, व्याकरणाकडे होणारे दुर्लक्ष यामूळे हळूहळू संस्कृत भाषेची महती कमी होण्याची भीती निर्माण झालेली आहे. परदेशात संस्कृत भाषेचा उपयोग करून अनेक शोध लावले गेले आहेत. आपण या देवभाषेकडे दुर्लक्ष करीत आहोत. तरी या संस्कृत भाषेचा गोडवा जतन करण्यासाठी ही लिपी सामाजिक माध्यमातून प्रसिध्द करून त्याची गोडी लहान मुलांना लावणे आवश्यक आहे. क्रमिक पुस्तकात त्याचे प्राथमिक ज्ञान देणे गरजेचे आहे. ग्रंथालयात संस्कृत भाषेची पुस्तके उपलब्ध केल्यास मुलांना ती सहज वाचण्यासाठी मिळू शकतील.
Comments
Post a Comment