यह है मुंबई मेरी जान!

            जॉनी वॉकरचे हे गाणे आणि अभिनयामूळे कायम लक्षात राहते. आहेच आमची मुंबई आमची जान!.  कुण्या पोर्तूगीजाला वाटले आणि चक्क आंदण म्हणून मुंबई इंग्रजांना देवून टाकली. त्यावेळची आणि आताची मुंबई याच्यात जमीन-अस्मानचा फरक आहे. दर 5 वर्षांनी मुंबई आपली कात टाकत असते. देशाची राजधानी जरी दिल्ली असली तरी मुंबई आर्थिक राजधानी आहे. मुंबईचा आब राखला म्हणून तर ती प्रत्येकाला आपली वाटते. सोन्याची अंडी देणारी आणि कोणालाही उपाशी ठेवणारी म्हणून सगळ्यांनाच मुंबई आवडते

           मी सन 1972 पासून मुंबई बघते. तेव्हा आत्याचे घर होते म्हणून आम्ही 4- दिवस राहून जायचो.  तेव्हाची मुंबई खूप वेगळी होती. तेव्हा कुणी मला भविष्य सांगितलें असते की मी सन 1992 पासून मुंबईत स्थायिक होणार तर खरे वाटले नसते. आज एवढ्या वर्षांनी मुंबईबद्दल लिहिण्याचा योग आला.  आधी शिक्षण, नौकरी, लग्न, मुली, स्वतःचे घर आणि बरेच काही मुंबईने मला दिले.

            मुख्य म्हणजे नौकरीनिमित्त अख्खी मुंबई जवळपास बघून झाली तरी अजून बरीच मुंबई बघायची शिल्लक आहे असे वाटते. त्या निमित्याने माणसे, अवतीभोवतीची परिस्थिती आणि खूप काही  बघायला शिकायला मिळालं. दिवस रात्रीही चालू असणारी मुंबई  झोपते कधी? असा प्रश्न पडतो. मुंबईकरांना कोणतीही आपत्ती रोखू शकत नाही. प्रत्येक संकटातून मुंबईकर स्वत: बाहेर पडतो आणि दुसऱ्यांना मदतही करतो. म्हणून जगात मुंबईकर नेहमी कौतूकाचा विषय असतो. महिलांच्या दृष्टीने सुरक्षित, सुसह्य हवामान आणि आपुलकीचे वाटायला लावणारी मुंबई कायम चाकावर चालते धावत असते.  सगळीकडून येणा-या माणसांमूळे दिवसेंदिवस मुंबई ओझ्याखाली दबत चालली आहे. सगळ्यांना सामावून घेणे तिला आता कठीण जात आहे.  तिचा ताण कसा कमी करता येईल याकडे आता गांभिर्याने बघायची वेळ आलेली आहे. मुंबईचे सौंदर्य, प्रदुषणमुक्त हवा आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.  कोविडमूळे बरीच मंडळी आता गावाकडे जायचे म्हणतात पण अजून पाय बाहेर निघत नाही. आकर्षण अजून कायम आहे.  जनतेने वेळीच सावध होऊन राजकारण करता या राणीचा मान राखला पाहिजे. सगळ्यांनी मनावर घेतले तर काही कठीण नाही.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव