अनुकरण आणि अनुभूती

              नकळत होणारे अनुकरण आणि प्रत्यक्षात येणारे अनुभव ह्या प्रवासाचे नाव आयुष्य आहे. किती  छान आयुष्याची व्याख्या सांगुन टाकली आहे ना !

            खरंच आपण आपल्या आयुष्यात हेच तर करीत असतो. फक्त त्याची योग्य सांगड घालणे हे प्रत्येक व्यक्तीच्या आकलन क्षमतेवर अवलंबुन असते. आई-वडीलांचे कधी त्या क्षेत्रातल्या मान्यवरांचे, राजकारण्यांचे, साहित्यिकांचे कोणाचे ना कोणाचे आपण पहिल्यांदा अनुकरणच करीत असतो. अगदी आपल्याही नकळत हे होत असतेते अंधानुकरण नसावे. देवानंद, राजेश खन्नाच्या केसांची स्टाईल बघुन स्वत:चे तसेच केस कापणारे लोक होते. तरूणपणात एक क्रेझ म्हणून किंवा मजा म्हणून अल्प कालावधीत ठीक आहेकायम जर तेच केले आणि म्हातारपणातही तेच करणे शक्य आहे का?  चांगल्या गोष्टींचे अनुकरण नक्कीच आवश्यक असते.

              दुसरी गोष्ट अनुकरणामुळे स्वत:ची पात्रता कशी सिध्द होणार? प्रत्येक व्यक्ती वेगळी, रंग वेगळा, भाषा वेगळी असे असताना सगळेच जण माधुरी दिक्षीत बनायला लागले तर कसे होणार? तीच गोष्ट पालकांची मोठ्यासारखे धाकट्याने व्हावे किंवा उलटे असे        -याचदा बिंबवले जाते.  ते तसे नसते ना! प्रत्येकाचा कल वेगळा, आवड वेगळी तेव्हा अशी जबरदस्ती मग अंधानुकरण ठरते. उदाहरण म्हणून किंवा दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शक इतपत ठीक आहेपूर्ण अनुकरण “Copy Cat” केल्यास ते इतरांनाही आणि कालांतराने स्वत:लाही आवडणार नाही. ठराविक साचा बनून जातो माणसाचा मग!

             अनुभवाचा शिक्षक तर असतोच. मग काय योग्य अयोग्य ते परिस्थितीनुरूप घेतलेले निर्णय आणि त्याचा प्रतिसाद असा एकूण अनुभवाचा आवाका असतो. इथेही प्रत्येकाच्या क्षमतेनुसार, प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो आणि वेगळाच असणे अपेक्षित असते. म्हणूनच जीवनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत असते. होणारे अनुकरण आणि येणारे अनुभव माणूस बदलायला परिणामकारक ठरतात.  प्रत्येकाने आपाआपल्या कुवतीनुसार प्रयत्न करावेत आणि यशस्वी व्हावे. येथे यशाची व्याख्यापण बदलते. विचारपूर्वक केलेले अनुकरण आणि आलेल्या अनुभवाचा निष्कर्ष माणसाचे व्यक्तिमत्व घडवित असते.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव