स्वयंपाक घरातील अपघात

                 स्वयंपाकघर म्हणजे स्त्रियांची कर्मभूमी. घरात काय असेल नसेल त्याच्यामध्ये (कोंडाचा मांडा) करुन घालण्याची कला सर्वच स्त्रियामध्ये कमी अधिक प्रमाणात असते. मला त्यासाठी बाईच्या जन्माचा पुरूषापेक्षा कधी कधी हेवा वाटतो. बायका कधी उपाशी तरी राहू शकत नाही. तेवढे एक काम काही पुरूषांना जमत नाही. हल्ली पुरूष मंडळी हळूहळू शिकतात.

              अशा या स्वंयपाकघरात अत्याधुनिक अनेक उपकरणे असतात. त्यात आता मोबाईलची भर पडलेली आहे. जळता निखारा घेऊन आपण फिरत असतो. पुर्वी स्टोव्हवर / सिलेंडरवर जळणा-या / जाळणा-या अपघातात -याच स्त्रिया मरण पावत. हल्ली हे प्रमाण कमी झाले आहे. तरी सावधानता बाळगावयास हवीच

                शक्यतो एकावेळी एकच उपकरण वापरावे. (गॅस इंडक्शंन) एकत्र लावू नये. दोन्ही कडे एकाच वेळी लक्ष देणे कठीण असते. किमान अंतर तरी असावे. सिलेंडची चाचणी ठराविक कालावधी नंतर करावी. रात्री झोपण्यापुर्वी किंवा ऑफिसला जायच्या आधी, बाहेर गावी जाण्यापुर्वी सिलेंडर बंद ठेवावा. मायक्रोव्हेव, ओव्हन, टोस्टर, ग्रिल आणि फ्रिज हे एकाच लाईनीत असू नयेत. हल्ली स्वयंपाकघर आकाराने लहान किंवा हॉलला जोडून असतात. त्यामुळे टिव्ही बघताना किंवा मोबाईलवर बोलताना दुर्लक्ष होऊ शकते. विशेषत: लहान मुले असताना तर जास्त काळजी घ्यावी लागते. कापायची धारदार यंत्रे (विळी, चाकू, कोयता) ही बंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. या सगळ्यांचा वापर काळजीपूर्वक शांत मनाने करावा. अन्यथा भाजी कापताना गडबडीत आपले बोट कापले जाऊ शकते. तेलाची / तुपाची फोडणी घालताना लांब उभे रहावे. कधीकधी डोळ्यात किंवा तोंडावर उडण्याची शक्यता असते. कुकरमध्ये पाणी घालायचे विसरल्यास कधी कधी झाकण किंवा शिट्टी उडून अपाय होऊ शकतो. तापविलेले पाणी, तापलेला तवा, गरम भांडी अशा वस्तूंना काळजीपूर्वक हाताळावे.

            स्वयंपाकघरात काळजीपूर्वक वावरावे. हल्ली साडी वापरत नाहीत शक्यतो कॉटन कपडे वापरावेत, खेळती हवा असेल तर सहसा अपघात घडत नाहीत. आवश्यक तेवढे सामान असावे. स्वयंपाकघर सुटसुटीत असावे. खूप जागा अडवणारे, इकडे तिकडे फिरायला अडथळा आणणारे आणि स्वच्छता राखणे सोपे जावे अशा -हेने स्वयंपाक घराची रचना असावी. योग्य ती काळजी घेतल्यास अपघात टळू शकतात. अपघात होतात म्हणून स्वयंपाक करणे टाळू नये.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव