कोकणी माणूस आणि कोकणी भाषा

               कोकणी माणूस आणि भाषा हे आपले महाराष्ट्राचे वैभव आहे. कोकणाचे सौंदर्य निसर्गाची कृपा कायम रहावी असे वाटते. आम्ही कारवारचे, त्यामुळे कोकणातलेच. फक्त थोडे लांब असल्यामूळे तेवढी प्रसिध्दी व्यापारीकरण झाल्यामूळे अजून कारवारचा अनवट ताजेपणा कायम  आहे.

             इकडे अलिबागपासून पार सावंतवाडीपर्यंत विखूरलेला कोकणी माणूस जरी मुंबईत रमला तरी गावची ओढ कायम असते. श्रध्दाळू, मायाळू, देव देवतांचे सण, जत्रा श्रध्देने पार पाडणारा. सगळ्यांना सांभाळून स्वत:ची ओळख कायम जपणारा. सुट्टी पडली, गणपती, होळी हे त्याचे पारंपारिक जिव्हाळ्याचे सण आले की गावी धावणारा असा हा कोकणी माणूस, बोलायला फणसासारख़ा काटेरी पण आतून प्रेमळ आहे. फळबागा, नारळ, पोफळी, काजू, फणस, आंबा आणि जेवणात भात मासे याचे जीव की प्राण.  कोकण रेल्वे, समुद्र किनारा होणारे विमानतळ जगाच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण करणा-या या माणसाला स्वत:ची मातृभाषा कोकणी ही अतिशय प्रिय.

             कोकणी भाषेचे अनेक प्रकार आहेत. मालवणची, सावंतवाडीची, गोवा, कारवारची, मंगरुळ, उडपी अशी वेगवेगळी आहे. कोकणी खूप गोड भाषा आहे.  या कोकणातून बरेच समाजसुधारक, साहित्यिक, उद्योजक, चाकरमानी यांनी मुंबईचे वैभव वाढविले आहे.  मुंबई पर्यंत मर्यादित असलेला कोकणी माणूस आता परदेशातही स्थिरावत आहे.  कोकणी माणुस बोलायला तिखट असला तरी मनातून प्रेमळ असतो अगदी कोकणातील फणसासारखा. दिवसेंदिवस कोकणचे सौंदर्य कमी होत चालले आहे. त्याची जपवणूक केली पाहिजे.

                करोनामूळे गावचे महत्व लोकांना हळूहळू पटायला लागले आहे. “कोकणचा कॅलिफोर्नियाकरण्याचे आव्हान तरुणांनी पेलून नवनवीन संधीचा फायदा घ्यावा आणि कोकणाचे नैसर्गिक सौदंर्य जपण्याचे काम परिश्रमपूर्वक करावे.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव