हे जीवन सुंदर आहे

           “चौकट राजामधले हे गाणे मला खूप आवडते. खरंच लाख मोलाचे जीवन आपल्याला मिळालेले असते ते आपण सुंदर बनवायचे की खराब करायचे हे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले असते. मध्यंतरी एका अभिनेत्याने वयाच्या 36 व्या वर्षी आत्महत्या केली. त्याच्यावरून बरेच राजकारण, उलटसुलट चर्चा आरोप- प्रत्यारोप असा एक विषय चघळायला लोकांना मिळाला. प्रत्यक्ष माणूस गेला, त्यांच्या आई-वडीलांना, भाऊ-बहिणींना काय वाटले असेल? याचा विचार वर स्वर्गात गेल्यावर त्याला कळले असेल तर कुठून मी आत्महत्या केली याचा नक्कीच त्याला पश्चाताप होईल.

           खरं तर मरण एवढे सोपे असते का? जगण्याची जिद्द असलेले अनेक रोगी (असाध्य रोग माहित असुन सुद्धा), कष्टकरी कामगार, उपाशीपोटी झोपणारे लहान मुले-मुली, वाईट काम करणारे (पोटासाठी), सामाजिक कार्यकर्ते, जीव धोक्यात घालून देशाची/ जनतेची सेवा करणारे, सैनिक, पोलीस, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, सरकारी नौकर इत्यादी हा विचार करीत नाहीत त्यांना त्यांचा जीव प्यारा नसतो का? अडचणी नसतात का? पैसा म्हणजे सर्वकाही असे समजणा-यांना बहुतेक ही समस्या जास्त जाणवते असे वाटते.

           काही धर्मात मेल्यानंतरचे कफन आणि पेटीचे पैसे अगोदरच वेगळे काढून ठेवण्याची पद्धत आहे. म्हणजे गेल्यावर लोकांना तेवढाही त्रास नको. जागा आणि पैसे सगळे मिथ्याच आहेतसुंदर देह तरी शेवटी मातीतच मिळतो. मग कशासाठी हा अट्टाहास ? जीवन म्हणजे पहिल्या शेवटच्या श्वासातले अंतर. मग ते सोडून आपण इस्टेट, पैसा पुढच्या पिढीची काळजी का करतो? आपण स्वत: कोणतीही हौस-मौज करता मुलांसाठी सर्व काही करतो. त्यांना याची जाणीव कुठे असते. त्यांना त्यांचे स्वत:चे जग वेगळे निर्माण करायचे असते. हातातले सोडून पळत्याच्या पाठी लागल्यामूळे दु: नशिबी येते. ते सहन होऊन अशा अघोरी उपायाकडे माणसे झुकतात.

           
               विदर्भातील शेतकरी आत्महत्या का करतात? कोकणातील शेतकरी का नाही करत? आहे त्यात समाधान मानून जगल्यास नक्कीच सर्व काही शक्य होते. त्यासाठी लागणारा संयम, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द एवढ्या भांडवलावर माणूस स्वर्गसुद्धा जमिनीवर आणू शकतो फक्त इच्छा पाहिजे जीवन सुंदर आहे याच्यावर विश्वास पाहिजे








Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव