मराठी भाषेचे वैभव
मराठी भाषा आणि त्याचे सौंदर्य दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. मुळात मराठी भाषा क्लिष्ट, उच्च शिक्षण व वैज्ञानिक माहिती उपलब्ध नसल्यामूळे त्याची वाढ काहीशी खुंटलेली आहे. त्यातच परकीय भाषेचे आक्रमण, त्याचे आकर्षण, ज्ञानाची अनुपलब्धता इत्यादी कारणामूळे मराठी भाषा दिवसेंदिवस दुर्लक्षित होत चालली आहे. याला जबाबदार आपणच नाही का? हल्ली किती पालक मुलांना मराठी शाळेत शिकायला घालतात? घरात व बाहेर किती जण मातृभाषेत बोलतात? आणि जी भाषा बोलतात ती शुध्द असते का? हा एक संशोधनाचा विषय असू शकतो. हे केवळ महाराष्ट्रात किंवा मराठी घरातच होते. इतर भाषिक राज्यात तेथील लोक सहजपणे व आवडीने स्थानिक भाषा बोलतात व त्यातून व्यवहार करतात. त्यामुळे त्या भाषेचे नैसर्गिकरित्या संवर्धन होते.
इथे महाराष्ट्रात राष्ट्रभाषा म्हणून सार्वजनिक ठिकाणी “हिंदी” तोडके - मोडके का होईना बोलले जाते मराठी बोलायला काही जणांना लाज वाटते.
सरकारी कार्यालयात मराठी सक्तीचे असूनसुध्द्दा इतरांच्या सोईसाठी सर्रास “हिंदी” किंवा “इंग्रजी” बोलले जाते. महाराष्ट्रात रहायचे तर मराठी बोलले पाहिजे. त्यामुळे काही इतर भाषिकसुद्धा मराठी बोलायला शिकतात.
जे खरे मूळ मराठी भाषिक आहेत ते स्वत:ची भाषा बोलण्यास कचरतात.
यातून आपली भाषेविषयीची अनास्था दिसून येते.
जगात जपान, रशिया, चीन, स्पेन आणि जर्मनी इत्यादी देशात त्यांच्या भाषेला प्राधान्य दिले जाते. सर्व साहित्य स्थानिक भाषेत उपलब्ध असते. या देशात रहाणा-या लोकांना इंग्रजी भाषा येत नसली तरी काही फरक पडत नाही. या देशाचे राष्ट्रप्रमूख दुस-या देशातल्या राष्ट्रप्रमूखांशी बोलताना केवळ त्यांच्या मातृभाषेचाच वापर करतात. आपली मराठमोळी संस्कृती परदेशातील लोकांना भूरळ पाडते आणि ते आपले काही बाबतीत अनुकरण करतात. “मोडेन पण वाकणार नाही” हा मराठी बाणा जपणारा माणूस भाषेच्या बाबतीत
उदासिन रहातो. येणा-या पिढीमध्ये मराठी भाषा रुजविणे व वृध्दींगत करणे ही काळाची गरज निर्माण झालेली आहे व त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जसे की राज्यातील सर्व शाळेत “मराठी” हा विषय 100 मार्कांचा अनिवार्य करण्यात यावा. व्यवहारात लिखित स्वरुपात
मराठी आवेदन किंवा अर्ज स्विकारण्यात यावे. संगणकाचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी करण्यात यावा. मराठी भाषिक लोकांनी आपापसात व इतरांशी व्यवहार करताना मराठीतून बोलले पाहिजे. त्यासाठी प्रथम घराघरातून मराठी बोलले पाहिजे.
Comments
Post a Comment