श्रावण महिना आणि निसर्ग

         श्रावण मासी  हर्ष मानसी, इकडे तिकडे चोहीकडे ..

        लहानपणीची ही कविता माझ्या आवडीची होती. तसाही श्रावण महिना मला खूप आवडतो. धार्मिक व्रतवैकल्य, सणांची रेलचेल सुरुवातीपासुन शेवटपर्यत चालूच असते. नाही म्हणायला मांसाहारी लोकांचा थोडासा उपवास घडतो. पण जे हा महिना पाळत असतील त्यांनाच. श्रावण महिन्यात उलट मासे स्वस्त असतात म्हणे. काहीजण वेगवेगळे नियम पाळत असतील तर त्यांना हा महिना समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. खरे तर आपल्या पूर्वजांकडून मुद्दामहून हा महिना शाकाहारी ठेवला असावा. समुद्रात श्रावण महिन्यात माशांचा पिल्ले घालण्याचा कालावधी असल्यामुळे ती जीवीत रहावी  या हेतूने या काळात मासेमारी बंद ठेवत असावेत.

          श्रावण महीन्यात निसर्ग अगदी खुश असतो. सगळीकडे हिरवे गलिचे पसरलेले, फुले आणि फळांचे उत्पादन भरपूर होत असल्यामुळे सगळीकडे सृष्टीसुध्द्धा आनंदाने नाचते असे वाटते. क्षणात पाऊस तर क्षणात ऊन असा सारखा खेळ सुरू असतो. शेतीलासुद्धा सुरुवात होऊन बऱ्यापैकी  शेतकरीवर्ग  स्थिरस्थावर झालेला असतो. ज्यांना गोड पदार्थ आवडतात त्यांची तर छान मजा असतेच. चमचमीत तेलकट ख़ाणे भरपूर मिळते.  पूजा, धार्मिक ग्रंथाचे वाचन, देवळात जाणे, तीर्थक्षेत्रांच्या भेटी देणे, दानधर्म करणे अशा अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरागत प्रथा पुढे चालू ठेवणे या महिन्यात शक्य होतात. अनेक गोष्टी पारंपारिकरित्या साज-या केल्या जातात जसे की मंगळागौर, हळदीकुंकू, जन्माष्टमी, रक्षाबंधन आणि दिव्याची अमावास्या. श्रावणात प्रत्येक वाराचे  त्यास संलग्न असलेले देवांचे महत्व असल्याने त्या त्या दिवशी विशिष्ट पदार्थ मुद्दाम सेवन केले जातात. जसे की नागपंचमीला पातोळी, राखी पोर्णिमेला नारळी भात इत्यादी. वारांचे महत्व जसे की सोमवार-शंकर, मंगळवार - गणपती, बुधवारी- पांढरे (सगळ्या पांढऱ्या वस्तू वापरीत असतात) गुरुवार- दत्ताचा  म्हणून उपवास, शुक्रवार -देवीचा म्हणून, शनिवार- शनिचा आणि हो रविवार सूर्याचे व्रत करणारे लोक आहेत. श्रावण महिन्यापासून चातुर्मास सुरु होतो आणि दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेला संपतो.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव