विसाव्याचे क्षण
विसावा कधी, केव्हां आणि कसा घ्यायचा हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक जीवनातला प्रश्न आहे. स्त्रियांना तसाही विसावा क्वचितच मिळतो. कायम पाठीमागचा कामाचा व्याप त्यांना विसावण्याचा विचारही करु देत नसावा. विसावा म्हणजे आवडत्या ठिकाणी वेळ व्यतीत करणे जसे की प्रवास, सिनेमा, नाटक, प्रदर्शन, देऊळ, विंडो शॉपींग, आवडता खेळ, मनोरंजन, हॉटेलींग, नातेवाईकांना भेट देणे हे सुद्धा विसाव्याचे क्षण ठरु शकतात. शेवटी मन प्रसन्न होणे महत्वाचे.
पूर्वीच्या काळी स्त्रीला निदान ४ दिवस महिन्यातून विश्रांती मिळत असे. बाळंतपणात किंवा आजारपणासाठी सक्तीची विश्रांति मिळत असे. आता
या सर्व गोष्टी आवर्जून टाळण्याचीच प्रवृत्ती आढळते. डॉक्टरने सांगितले तरच शक्य आहे. मागे "आई रिटायर होते" एक नाटक बघितले होते. निसर्ग काही बाबतीत स्त्रियांना जास्त ताकद देत असावा, म्हणून ती सतत कार्यरत असते.
स्वत:साठी वेळ काढा म्हणून हल्ली बरेच जण वेगवेगळ्या प्रकारे सांगत असतात पण
ऐकायला वेळ कुठे असतो ? सगळा वेळ घरकाम, प्रवास, कार्यालयीन काम आणि राहिला वेळ तर झोप अशी सर्वसाधारणपणे सगळ्यांची दिनचर्या असते. परंतू सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात विसाव्याचे क्षण शोधणे आणि त्याप्रमाणे प्रयत्न करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला विसावा कशात मिळू शकतो हे ही तेवढेच महत्वाचे. “दिनचर्येतील बदल” कधी कधी आवश्यक ठरतो.
स्वेच्छानिवृत्ती कधी घ्यावी हे ही प्रत्येकाने ठरविणे आवश्यक आहे मग ती घरातल्या कामातील असू हे नाहीतर कार्यालयीन कामातील असू दे. कुठे आणि कधी
थांबायचे हे ज्याचे त्यांनी ठरवायचे. कधी कधी थोडासा विसावा नंतरच्या कामासाठी अधिक उर्जा देऊ शकतो म्हणून असे विसाव्याचे क्षण शोधत राहिले पाहिजे. आता टाळेबंदीमूळे सक्तीचा विसावा मिळाल्यासारखे
झाले आहे. इतर कामे, घरकाम, नवीन काही तरी प्रेरणादायी काम हाती घेतले तर हा विसावा
वरदान ठरू शकेल.
Comments
Post a Comment