शिक्षा कशी असावी?

               एका शाळेतशिक्षा कशी असावीहा चर्चेचा विषय होता. -याच लोकांनी बरीच मते मांडलीएका व्यक्तीने एका वाक्यात असे विधान केले, “शिक्षा तारक असावी, मारक असू नये”,  योग्यच होते तेमुळात कोणतीही शिक्षा करण्याचा हेतू हा वर्तनात सुधारणा व्हावी असा असतो.  कधी कधी गुन्हा आणि शिक्षा याचे व्यस्त प्रमाण आढळून येते तर कधी कधी विनाकारण शिक्षा भोगावी लागते. काही जण गुन्हा करुनही शिक्षेपासून वाचायचा आटोकाट प्रयत्न करीत असतात.

               शिक्षा कधी शारिरीक, आर्थिक, भावनिक किंवा सामाजिक स्वरुपात असू शकतात. शाळेतून हल्ली शारिरीकशिक्षा करणेहद्दपार करण्यात आलेले आहे.  त्यातून जो दरारा, भिती, वाईट काम करून नये म्हणून दहशत निर्माण व्हायची ती आता होत नाही.  पालकसुद्धा हल्ली मवाळ भुमिका घेतात. कुठे  मुले जीवाचे बरे- वाईट करून घेतील या भितीपोटी.  मग काय सगळाच आनंदी आनंद!   कुठलाही गुन्हा किंवा चुका करायला आपण अप्रत्यक्षपणे मुभाच देत आहोत असे नाही का वाटत? लहानपणी आईने थप्पड मारली असती तर आज मी गुन्हेगार झालो नसतो अशा गोष्टी ऐकत आपण मोठे झालेलो आहोत. मोठेपणी  आपण मुलांच्या बाबतीत मवाळ का बनतो? कायदा, समाज, परिस्थिती काही अपरिहार्य कारणामूळे गुन्हे घडतात, त्या गुन्ह्याला त्याला  एकटयाला जबाबदार धरले जाते.  त्याच्या बरोबर इतर घटकही जबाबदार असतात. गुन्हेगाराची पार्श्वभूमी विचारात घेऊन तसे शिक्षण सुरू केल्यास कदाचित गुन्हेगार कमी निर्माण होतील.  क्षणिक राग आणि गैरसमजामूळे अनेक गुन्हे घडतात. असे गुन्हे घडू नयेत म्हणून लहान वयात मुलांची जडण-घडण व्यवस्थित होणे आवश्यक आहे.

               अनेक त्रूटी, अन्यायकारक वागणूक, विषमता आणि नको त्या गोष्टींना नको तेवढे दिले जाणारे महत्व इत्यादी बाबींचा विचार शिक्षा देताना केला गेला पाहिजे. तसेच काही ठराविक गुन्हयांना कडक शिक्षा दिली गेली पाहिजे जेणेकरून दुसरा गुन्हेगार निर्माण होणार नाही.  प्रत्येक व्यक्तीला शांती सुव्यवस्था अपेक्षित असते, ती  मिळत नाही तेव्हा त्या गोष्टीचा  विस्फोट होवून त्याचे रुपांतर गुन्ह्यात होते.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव