मुलांचा दृष्टीकोन
हल्लीची पिढी कसा विचार करते ते कधीकधी आपल्याला कळतच नाही. प्रत्येक नवीन पिढी आधीच्या पिढीपेक्षा हुशार, सुधारित
मतांची, आधुनिक विचारसरणीची असणार हे नक्की. कधी कधी तरूणाई काय काय करते थक्क व्हायला होते. जसे
परदेशी जाऊन, शिक्षण घेऊन तेथेच स्थायिक होणारे आहेत. इथे कष्ट करण्याची तयारी नसते.
काही सामाजिक कामात वाहून घेणारे आहेत. मुलांना
जन्म दिल्यावर स्वातंत्र्यावर गदा येते म्हणून लग्नच न करणारे आहे. लग्न न करता मुले दत्तक घेऊन सांभाळ करणारेपण आहेत. करीअर,
पैसा याच्यामागे लागल्यामूळे मूल देऊ शकत नाही मग सरोगसी करून मातृत्वाचा
आनंद मानणारेपण आहेत. उद्याचे कोणी बघितले म्हणून उधळपट्टी करणारे आहेत तर दिवसेंदिवस वाढणारी
महागाई बघून वेळीच नियोजन करणारे आहेत.
नौकरी, मुल आणि घर यामध्ये होणारी घुसमट टाळून स्वत:साठी
जगणारे आई-बाबा दिसतात. मुद्दाम नौकरी सोडून
घरात रहाणारे आई किंवा बाबापण दिसतात. मुलगा किंवा मुलीचा जन्म
होतानाचा आनंद उपभोगण्यासाठी करीअर बाजूला ठेउन मुद्दाम घरी रहाणारे बाबा दिसतात.
बाहेर पिझ्झा व बर्गर खाल्यावर घरी येऊन आईच्या हातची चपाती भाजी खाणारे
मातृभक्त असतात. वेगवेगळ्या क्षेत्रात आजची मुले धाडसी निर्णय
घेऊन त्यांचे ध्येय पूर्णत्वास नेतात. कमवायला लागल्यावर स्वत:च्यापैशाने
आई-वडीलांना पार्टी, सहल प्रायोजित करणारे
असतात. जे आमच्या पिढीने केले नाही. ते
आज करून दाखवतात आणि नक्कीच अशा मुलांचा आई-वडिलांना अभिमान वाटतो.
जसजशी मूले मोठी होतात तस तसे त्यांचे दृष्टीकोन बदलत जातात. आई-वडीलांच्या मताला विरोध करणे आणि आपलेच खरे करणे अशा अनेक कारणांनी पटत नाही पण “तुझे माझे जमेना तुझ्या विना करमेना” अशी परिस्थिती ब-याच वेळा उदभवते त्यातून काही मार्ग काढून एकमेकांना सांभाळून घ्यावे लागते.
Comments
Post a Comment