स्वातंत्र्यानंतरची स्त्रियांसमोरील आव्हाने

            स्त्री स्वातंत्र्याला जवळपास 70 वर्ष झाली तरी आपण अजून जगाच्या मागेच आहोत असे कधी कधी वाटते. अर्थशास्त्रात एक म्हण आहे. “What is the use of freedom if the purse is empty” (जर पर्स रिकामी असेल तर स्वातंत्र्याचा काय उपयोग?).  अनेक क्षेत्रात स्त्रियांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवलेला आहे. जबाबदारी कर्तव्यामध्ये स्त्रिया आघाडीवर असतात. अर्थशास्त्र, शेअरबाजार आणि रत्नपारखी हे किचकट विषयसुद्धा स्त्रिया कौशल्याने हाताळू शकतात

            असे असतानाही भावनिक किंवा मानसिक पातळीवर काही स्त्रिया का मागे पडतातहा प्रश्न मला  कधी कधी पडतो. इतिहासात राजकारण लढाया करणा-या काही स्त्रिया होत्या. तरी स्त्री जातीला भेडसावणारेसार्वत्रिक प्रश्न पडणारे पेचहा एक संशोधनाचा विषय ठरु शकेल. या सर्वातूनही प्रयत्नपूर्वक बाहेर पडणा-या आणि दुस-यांना आशेचा किरण दाखविणा-यां या देखील स्त्रियाच असतात. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा धैर्य आणि प्रेम गवसणा-या या स्त्रियाच आहेत. वेगवेगळ्या भुमिकेत असुन घरात आणि बाहेर अनेक आयुष्य जगणा-या स्त्रिया आहेत.

            मग एवढे सगळे असताना वाईट वागणुक, पुरुषी मानसिकता, अविश्वास आणि लैगिंक / मानसिक / शारिरीक अत्याचाराला बळी पडणा-यांचे प्रमाणही कमी नाही. शिक्षण आणि विकास हा स्त्रियांच्या प्रगतीमध्ये अडसर ठरतो का?  तिच्या भावनिकतेचा गैरफायदा घेतला जातो कापुरुषावर अवलंबुन राहिल्यामूळे जो इगो सुखावला जातो  त्याला ठेच पोचते का? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.

         त्यासाठीच आर्थिक स्वावलंबन, कणखरपणा आणि सारासार बुध्दी वापरुन निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ करण्याची आवश्यकता आहेकशी ते पहा.

1.           आवश्यक असेल तेथे विरोध करणे.

2.           योग्य वेळी समज देणे. ( प्रसंगी कायद्याचा आधार घेऊन )

3.           कामाची योग्य माहिती करून घेणे.

4.           कुणाच्या आग्रहाला बळी पडता योग्य तो निर्णय घेणे.

5.           आरोग्यावर परिणाम होत असेल तर वेळीच सावध होणे.

6.           आर्थिक व्यवहार जपून करणे.

7.           पराभव, यातना, अपयशाच्या भितीने निराश होऊ नये. तज्ञ व्यकींचा सल्ला घेतल्यास मार्ग निघू शकतो.

8.          उंच उडायचे असेल तर जमिनीचा मोह सोडावा लागतो”, हा मंत्र प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे.

9.           काय निवडायचे ते स्वातंत्र्य तुमचे. एकदा निवडल्यावर पुढेच जायचे.

10.     आयुष्य तुमचे आहे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हा. 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव