असे होते कधी कधी

            आपल्याही नकळत आपण कधी कधी विचित्र वागत असतो. नंतर वाटतेअरे असे का वागलो आपण ?” अशा वेळी होतेअसे कधी-कधी”  (It Happens Sometimes) म्हणून स्वत:च स्वत:ला माफ करायचे आणि तो विषय सोडून द्यायचा. -याच वेळा आपण विचार एक करतो वागतो दुसरेच. विशेषत: कधी कधी रागाचा पारा उगीच वाढवत असतो. नंतर वाटते कशाला रागावलो आपण? लगेच मनाला समजावयाचे आणि “Chill Yaar” (होत कधी कधी) असे म्हणायचे. दुस-याची बाजू ऐकून घेता आपण आपलेच अंदाज बांधतो आणि  प्रत्यक्ष परिस्थिती कळल्यावर आपल्याला आपली लाज वाटते.

           मुलांचा, आपल्या हाताखाली काम करणा-या लोकांचा कधी कधी उगाच पाणउतारा करत असतो. त्याऐवजी थोड्या चांगल्या भाषेत बोललो तर दोघेही खूष ( असे नंतर वाटते )  वस्तू असतात वेळेवर मिळाली नाही म्हणून किंवा तात्काळ हवी म्हणून आपण जावून घेवून येतो. आल्यावर ती वस्तू घरातच मिळते. शिस्त, व्यायाम, व्यवस्थितपणा याबाबत आपण कायमच आग्रही असतो एक दिवस असा येतो सगळे काही सोडून जास्तच बेजबाबदार बनतो.

          आयुष्यभर टापटिप राहणारी माणसे अचानक कसेही  राहतात. तेव्हा प्रश्न पडतो की, हीच का ती व्यक्ती? दुस-यांना कायम व्याख्यान देऊन हैराण करणारे कधीतरी आपल्याला कुणी हक्काने बोलवेल का म्हणून वाट बघत असतात. नौकरी, घर,  मुले,  शेजार-पाजार, नातेवाईक सर्व जण हवेहवेसे वाटणारे, एखाद्या क्षणी असे वाटून जाते की मला आता कुणी नको. एकटे राहूया थोडे दिवस.

              या सगळ्या अवस्थांमधून प्रत्येकजण कधीना कधी जातच असतो पण ही अवस्था तात्पुरती असते. तिला जास्त महत्व द्यायचे नसते. एखादी वाईट अवस्था ही तात्पुरती समजून आणि हे दिवसही जातील असे मनाला समजावून पुन्हा परत सामान्य वागणे हीच सजगता होय.  दुर्लक्ष केल्यास मोठ्या मानसिक आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. असे वारंवार घडत असल्यास तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.  

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव