पोटासाठी काहीही ..

 चाणक्याने लिहून ठेवले आहेजेव्हा एखादी भुकेली व्यक्ती भाकरीसाठी चोरी करताना सापडते तेव्हा त्याबद्दल देशातील लोकांना लाज वाटली पाहिजेया वक्तव्याला कित्तेक शतके उलटून गेली तरी अजूनही परिस्थितीत सुधारणा दिसून येत नाही.  आजही जगात काही ठिकाणी कित्येक जण उपाशी, अर्धपोटी किंवा कुपोषित लोकांचे मोठे प्रमाण आढळते. याला जबाबदार कोण? ते स्वत:?  परिस्थिती?  सरकार? की भोवतालचा समाज?

            सर्व सजीवांना पोट असते आणि आपआपल्या परीने त्याची ते सोय लावतात. परंतू माणूस हवास्यापायी धान्याचा अतिरीक्त साठा करतो कृत्रिम टंचाई होऊन इतरांना वंचित ठेवतो. “चोच देणार तो चारा देणारअशी म्हण होती. परंतू असे किती दिवस दुस-यांवर अवलंबून रहाणारस्वत:, शेतकरी, शासन समाज यांच्या एकत्रित प्रयत्नाने सर्वांचे  “उदरभरण करणे”  शक्य होईल.

            एकीकडे अशी परिस्थिती तर दुसरीकडे खाण्यासाठी जगणारी माणसे आहेत. जीभेचे वेगवेगळे चोचले, जे कधी कधी आरोग्यासाठी अहितकारक असतात तरी आवडतात म्हणून खाणारे त्यांची संख्या खूप आहे. सकस, ताजे आणि वेळेवर अन्न खाणे हा निसर्गाचा नियमसुद्धा आपण आपल्याही नकळत पायदळी तुडवतो आणि अनारोग्याला आमंत्रण देतो. एकतर शुध्द हवा, पाणी आणि अन्न हे दिवसेदिवस दुर्लभ होत चालले आहे. दुसरीकडे ज्यांना सहज अन्न मिळते त्यांना त्याची किंमत नसते म्हणून त्याची नासाडी, अनावश्यक साठा, पुरवून खाणे (फ्रिजमधील शिळे अन्न, फ्रोजन) अशा घातक सवयीमूळे आपण आपले नुकसान करतो असे वाटते.

        पुर्वी युध्दामध्ये शत्रूची रसद तोडणे हे एक महत्वाचे काम असे. भूकेने सैंनिक त्रस्त झाले की, लढायला त्राण रहाणार नाहीत परिणामी शत्रुवर न लढता विजय मिळवणे सोपे जावे हा त्यामागे हेतू असायचा.

         अशावेळीथोडे खा पण सकस खाजे आपण लहानपणी शिकलो होतो. ते पुन्हा चळवळरुपी आंदोलनाने सुरू करावी लागेल असे वाटते. “शांतीचा मार्ग पोटातून जातोअसे म्हणतात. पोट भरलेले असले की डोके शांत, डोके शांत असले की निर्णय क्षमता, उत्साह आणि रहाणीमान यावर नक्कीच सकारात्मक परिणाम

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव