रुचिपालट - एक अविभाज्य घटक
ब-याच वर्षापूर्वीची गोष्ट त्यावेळी दिवाळीनंतर अनेक दिवाळी अंकामधून माझे लक्ष “रूचीपालट” या विशेषांकाकडे वेधले गेले. मग मी ते विकत घेतले. त्यावेळी दिवाळी अंक विकत घेवून वाचल्यानंतरच दिवाळी पूर्ण झाल्यासारखी वाटायची. “रुचिपालट” अंकात निरनिराळे नवीन पदार्थ, कृती आणि इतर वेगवेगळे विषय हाताळून आपले वेगळेपण नावाप्रमाणे सिध्द करून दाखविले होते.
सर्वसाधारणपणे “रुचिपालट”
हा शब्द खाण्याशी निगडीत समजला जातो. परंतू जीवनाची
ही रुची आपण बदलू शकतो. किंबहुना तो एक अविभाज्य घटक समजावयास
हरकत नाही. नेहमीच्या धावपळीच्या जीवनात कुठेतरी आपण केव्हा तरी
कंटाळत असतो. अशावेळी एकदम आपल्याला बदलायची आवश्यकता भासते.
कधी कधी मनात नकारात्मक विचार पिंगा घालू लागतात. त्यातूनच कधी कधी अंतिम टोक गाठून जीवाचे बरे-वाईट करण्यापर्यंत
मजल काही दुर्देवी जीव गाठतात. एवढी टोकाची भुमिका घेण्याआधीच जर आपण आपला थोडासा मार्ग बदलल्यास तोच नवीन
मार्ग भासेल कसा ते आपण आता पाहूया !
1.
गृहिणीचे किंवा नौकरदार महिलांचे आणि पुरुषांचे मुंबईत घड्याळ्याच्या
काट्याप्रमाणे आखीव-रेखीव जीवन असते त्यात थोडा बदल करून पहा. लगेच तुम्ही म्हणाल, आमचे वेळापत्रक कोलमडेल असे
मुळीच नाही होणार उलट अपेक्षित बदल केल्यास उत्साह वाढेल.
2.
एकूण कामात व जबाबदारीच्या कामांत थोडासा बदल करून थोडी थोडी
वाटून दिल्यास एकावरचा ताण कमी होईल.
3.
मुलांबरोबर अभ्यासात नवीन गमती-जमती असतात ते पटविणे.
4.
रोजचे जेवण, न्याहरी, संध्याकाळचे
खाणे यात न अडकता एखादा नवीन खाण्याचा प्रकार करावा किंवा हॉटेलात जाऊन एक दिवस स्वयंपाकाला
दांडी मारावी.
5.
एखादा दिवस उपवास करावा त्यादिवशी हलका-फुलका आहार किंवा फलाहार
करावा.
6.
स्वत:साठी थोडा तरी वेळ राखून ठेऊन त्यात रममाण व्हावे.
7.
गावी जावे किंवा प्रवासाला निघावे त्यात भटकावे. नातेवाईकांना भेटी
द्याव्या.
8.
वृध्दाश्रमांना, अनाथाश्रमांना आणि जंगल सफारी यांना भेटी द्यावा.
9.
स्वत:च्याछंद जोपासण्यासाठी वेळ द्यावा.
10.
आरोग्याची प्राथमिक माहिती आत्मसात करावी.
11.
ऋतूमानाप्रमाणे खाण्या-पिण्यात, रहाणीमानात बदल
करावा.
12.
घरसजावटीत नाविन्य कसे दिसेल ते पहावे.
13.
घरातील जुन्या व पारंपारिक वस्तू हाताळावयात.
14.
श्रमदान आणि वृक्षारोपण करावे.
असे अनेक बदल आपण आपल्या जीवनात आणू शकतो. हा बदल लहानपणी किंवा तरूणपणी आवश्यक असतो असे नव्हे तर कित्येकदा म्हातारपणी याची आवश्यकता भासते. मग अशा वेळी डगमगून न जाता त्यातून मार्ग काढावा लागतो. तेव्हा आपण समाधानाने जगण्यासाठी “रुचिपालट” कसा आवश्यक / अविभाज्य घटक बनवू शकतो हे आपल्याच हातात आहे. बाय द वे, काही वर्षापुर्वी माझ्या काही पाककृती
व लेख “रुचिपालट” या मासिकात प्रसिध्द झाल्या होत्या.
नवीन बदलास शुभेच्छा !
Comments
Post a Comment