महिलांचे आरोग्य व सजगता

              महिलांचे आरोग्याबद्दल त्या स्वत: किती सजग असतात आणि कुटूंबातील किती जणांना त्याचे गांभिर्य लक्षात असते हा एक संशोधनाचा विषय ठरू शकेल. सजगता तर लांबची गोष्ट किमान आरोग्याच्या सवयी, पथ्य, आहार वेळच्या-वेळी तरी घेतात का?. पुर्वीच्या स्त्रिया घरातच असल्यामूळे आणि एकत्र कुटूंबात रहात असल्यामूळे थोडी फार आरोग्याची काळजी नकळत घेतली जायची. परंतू आता  घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी तिची धावपळ होत असल्याने आरोग्याकडे लक्ष द्यावयाला तिला वेळच मिळत नाही. अशा वेळी घरातील माणसांनी थोडी फार मदत केली तर तिची प्रकृती  व्यवस्थित  राहू शकेल.

            लहानपणापासून शिक्षण, करिअर, आर्थिक आणि संसारिक जबाबदारी यात आताच्या स्त्रियांचे स्वत:च्याआरोग्याकडे दुर्लक्षच होते. याला जबाबदार थोडी ती स्वत: आणि घरातील इतरही असतात. नौकरी करणा-या किंवा घरी असणा-या किती स्त्रिया नाश्ता वेळेवर करून बाहेर पडतात. सकाळी उठल्यावर साधे गरम पाणी, लिंबू, मध किंवा हळद या सारख्या आनुषंगीक गोष्टी घेणे लांबच. संध्याकाळी आल्यावर पती दमला म्हणून अंग ताणून देवू शकतो. पत्नी असे करू शकते का? बरे वेळ वाचावा म्हणून बाहेरचे सुके खाणे, स्वयंपाक करायला बाई ठेवली तरी तिचे प्रकार किंवा नखरे दिर्घकाळ चालतील असे नाही. शिवाय मानसिक ताप होतो तो वेगळा.

           आता  थोडी परिस्थिती सुधारत आहे. स्त्रियांचे साधारण वय वर्ष 50 झाल्यानंतर का होईना, निसर्गाने धोक्याची घंटा वाजविली की मग सावध होतात आणि पथ्य पाणी आरोग्याकडे लक्ष देतात. कधी कधी उशीर झालेला असतो. वेळ निघून गेलेली असते. येवढा उशीर होईपर्यंत का थांबयचे?. कुटूंबाचा कणा असलेली स्त्री जर आजारी पडली तर सगळे घर आजारी पडते. म्हणूनच आधी स्वत:च्या आरोग्याबद्दल  जागरूक राहिल्यास स्वत: बरोबरोच इतरांचीही काळजी आपोआपच घेतली जाईल यात शंका नाही.  त्यासाठी घरातल्या इतर सदस्यांनी तिला तिची काळजी घेण्यास भाग पाडणे आणि तिला त्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव