देव ही संकल्पना

            देव ही संकल्पना आहे की नाही याबाबत -याचवेळा मतभेद असतात. आहे म्हणणारे आणि नाही म्हणणारेमानला तर देव नाहीतर दगड. दगडालाशेंदुर फासला की झाला देवअसे काही जणांचे असते. आज लोकांचा देवावरील विश्वास दुर्मिळ होत चालला आहे. देव प्रत्यक्ष प्रकट होऊन दिसत नाही. देव कुठून कसा आणि कोणत्या रुपात दर्शन देईल याचा अनुभव घेतल्याशिवाय सिध्द करणे शक्य नाही.   

             मुळात देव म्हणजे काय?  आपल्यातलेच चांगले गुण जोपासणे म्हणजे देवत्व.  देव आणि वेगळा काय असतो? काहीजण माणसांत, मंदिरात, मुक्या जनावरांमध्ये, गरजू लोकांमध्ये  शोधतात तर काही जण मूर्तीरुपी देवाचे अवास्तव महत्व वाढवून वेगवेगळ्या रुढी, परंपरा आणि अंधश्रध्दांना बळी पडतात. खरं तर देव आपल्या मनात आणि वागण्यात दिसावयास हवा. पण आपण देव शोधतो बाहेर. “देव नाही देव्हा-यात, आहे आपल्या मनात” हे जेव्हा माणसाला कळेल तेव्हा -या अर्थाने माणुस समृध्द होईल.

            निसर्ग, नियती आणि नशीब हे काही शब्द  देवाच्या अस्तित्वाबाबत कधी कधी प्रश्न उभे करतात. खरं तर पुर्वीचे ऋषीमुनी हे समाजमनाचे अभ्यासक होते. त्यांना माहित होते की, ठोस पुरावा दाखविल्याशिवाय माणूस विश्वास ठेवणार नाही आणि प्रत्यक्ष बघितल्याशिवाय व विश्वास ठेवल्याशिवाय मानवी मनाला, कार्याला स्थैर्य लाभणार नाही. मुर्तीची स्थापना, पुजा,  स्वच्छता, पावित्र्य आणि वाईट कामाची  शिक्षा देव  देणार हे  जेव्हा

बिंबवले गेले तेव्हाच मानवाचा विश्वास बसला. मग हळूहळू त्याचे अवडंबर माजू लागले. आजही देवळासमोरच्या रांगा अगदी तरूमुलांनी भरलेल्या असतात तेव्हा आश्चर्य वाटते. कुणावर अवलंबून राहणे हे चुकीचे  आहे.  प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. यश मिळणे वा मिळणे आपल्या हातात नाही मात्र अमुक देवाचे आम्ही भक्त आणि जे नाहीत ते नास्तिक असा -याचवेळा गैरसमज होतो.  हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे किंवा काही चालीरिती पुर्वापार चालत आलेल्या असतात. मग त्या आपण का मोडावयाच्या आणि समजा मोडल्या आणि काही अरिष्ट आले तर! या भितीपोटी बरेचजण धार्मिक कार्य करायला तयार असतात. अशा या देवालारिटायर का करु नये” ? असे एका प्रसिध्द अभिनेत्याने म्हटले होते. अर्थात ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते आणि देव रिटायर झाला तर सृष्टिचक्र / निसर्ग कोण चालविणार?  फार तर आपण असे म्हणू शकतो की, सर्व विश्वाचे कारभार चालविणारी एक अदृष्य शक्ती आहे की जिच्यावर मानव अद्याप नियंत्रण आणू शकत नाही.

Comments

  1. छान लिहिलय.

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर अदृश्य शक्तीलाच लोक देव समझातात
    Umesh Madan
    umesh.madan3@gmail.com

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव