दर्शनमात्रे मन कामनापुर्ती

        “दर्शन देरे भगवंताअसे म्हणून माणूस देवाला आळवित असतो. देव प्रसन्न होतो असे आपण चित्रपटात  -याचवेळा बघतो. मग खरंच हे शक्य आहे का? कित्येकदा आपण गर्दीत देवदर्शनासाठी जातो आणि कधी कधी गर्दीचेनको तेअनुभव येतात. मग खरंच अशा ठिकाणी देव असतो का की जिथे भाविकांमध्ये ताटातुट होते. काही हरविले जाते किंवा लुबाडले जाते. -याचवेळा दर्शनासाठी (शिर्डी, चारधाम, तिरूपती, अनेक तिर्थक्षेत्रे) येथे जात असताना अपघात होतो आणि कधी कधी अख्खे कुटूंब किंवा इतर मृत्युमूखी पडतात. मग त्यांना देव का नाही वाचवू शकत?. कित्येक जण नवस फेडायला जात असताना त्यांना प्रवासात मृत्यू येतो. हिंदु धर्माचा किंवा इतरांचाही चंद्र, सुर्य, तारे इत्यादीनां देव मानणारे आहेत. त्याचे दर्शन घेतल्याशिवाय जेवाणार नाही. (विशेषत: ईद का चांद, आपली संकष्टी, करवाचौथ . अनेक). मग कधी पावसाळी ढगामुळे दर्शन होत नाही मग उपाशी रहाणार का?

           अशा प्रत्यक्ष ईश्वर दर्शनाची ओढ प्रत्येकाला असते पण कलियुगात शक्य नसते. कारण देवाचे स्वरूप, अंग अस्तित्व कालपरत्वे बदलत असते. भुकेलेल्या अन्न दिल्यावर त्याचे तोंड समाधानाने खुलते ते देवाचे दर्शन. भयंकर त्रासातून किंवा जीवघेण्या आजारातून डॉक्टर जेव्हा रुग़्णाला बरे करतो आणि तेव्हा त्या रुग्णासाठी डॉक्टर हा देव असतोअत्याचारातून, अन्यायातून सोडविणारे पोलीस न्यायाधीश हे त्या त्या वेळी समोरच्या व्यक्तीला देवस्वरूप वाटत असणार.

              शिक्षकाची ओघवती वाणी आणि ज्ञान बघून विद्यार्थी जेव्हा खुष होतो. तेव्हा तो ही देवाचे प्रत्यक्ष दर्शन घेत असतो. एकूण काय आणिबाणी, अडीअडचणीच्या वेळी जो धावून आला तोच खरा देव आणि त्याचे दर्शन महत्वाचे. कधी कधी अनामिकही अशी मदत करून जातात आपल्याला त्याची माहिती नसते. आपल्याला कळेपर्यंत ती अनामिक व्यक्ती निघून गेलेली असते. लहान मुलांच्या दृष्टीनेआईचे दर्शनहेच मोठे आश्वासक असते. तसेच दूरदेशी गेलेल्या मुलांच्या दर्शनासाठी आई-वडील व्याकूळ होत असतात. ओझरते दर्शन (Whatsup वरील) माणसाला सुखावते.

               आयुष्यात कधी ना कधी हा योग येतो. डोळसपणा असल्यास आपल्याला त्याची जाणीव होते. अन्यथा आपण तसेच असमाधानी राहतो आणि वाट पहात बसतो. 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव