बाहुली

                लहान मुलींचे आणि बाहुलीचे एक अतुट नाते असते. हळूहळू मोठे होताना ती एक स्वत:च शोभेची बाहूली बनते. क्वचित स्वत:ची नवीन ओळख निर्माण करणा-या महिला असतात पण उरलेले सगळे जण स्वत:ची ओळख विसरुन आल्या प्रसंगाला तोंड देत असतात. मला वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या बघायला आवडतात. ठकी पासून बार्बीपर्यंत. बाहूल्या कापड, लाकूड, रबर, प्लॅस्टिक, फायबर आणि धातूच्या असतात.   माझ्या मुलींना आवडत नसल्याने त्यांना त्याचे काही कौतुक वाटत नाही. अशी शोभेची बाहुली ऑस्कर पासून निरनिराळ्या स्वरूपात, प्रसंगात बक्षिसरुपी मिळत असते. त्यासाठी केवढा आटापिटा केला जातो.

                अनेक गोष्टी, कविता, गाणी बहुधा सिनेमात आणि जाहिरातीत लहान मुलीच्या हातात बाहुलीला महत्वाचे स्थान असते. खरे तर अख्खे लहानपण तिच्या बाहुलीभोवती फिरत असते. मग भातुकली, लग्न, संसार अशा चढत्या वयाच्या क्रमाने खेळल्या जातात.

                 हल्लीच्या मुलींना या बाहुलीच्या भावविश्वाची कल्पनाच येणार नाही. भातुकलीचा खेळ, त्याची मांडणी, पावसात भिजणे, तिला जिवापाड जपणे, तिला खाऊपिऊ घालणे, औषध देणे, झोपवणे इत्यादी क्रिया आपसुकच केल्या जातात. त्यामुळे त्यांची मोठ्या माणसांची नक्कल करायची वृत्ती आणि त्यांचे अनुकरण करणे वाढीस लागते. या खेळातूनच भविष्यातील त्यांचे मनसुबे आकारले जात. या खेळातून त्यांच्या स्वभावाचे प्रतिबींब दिसायचे. अशा अनेक गोष्टी आमच्या पिढी पासून आता हळूहळू नामशेषच होतील की काय असे वाटते.

                काही बाहुल्या  कपाटात कायम शोभेचे स्थान मिरवित असतात. त्यांचे कपडे, दागिने, रहाणीमान बघण्यासारखे असतात. जत्रेत आणि गावात अजूनही बाहुल्यांचे विश्व कठपुतली स्वरूपात काही प्रमाणात दिसतात. विशेषत: राजस्थानी लोक खूप छान परंपरागत बाहुल्या बनवतात आणि विकतात.  मुलांच्या खेळण्यात सहसा बाहुल्या नसतात आपली बायको, मुलगी,सुन बाहुलीसारखी असावी असे प्रत्येक पुरूषाला वाटते. काही पुरूषांची अपेक्षा उठ म्हटले की उठणारी. बस म्हटले की बसणारी अशी आज्ञाधारक जिवंत बाहुली हवी असते. असे हे बाहुली पुराण प्रत्येक मुलीच्या आयुष्यात वेगवेगळे स्थान निर्माण करते. मुली मोठ्या झाल्यावर, अभ्यासात गुंतल्यावर या तकलादू बाहुलीचा विसर पडतो आणि त्या कपाटात विराजमान होतात. माझे वैयक्तिक मत असे आहे की बाहुलींची आठवण प्रत्येकाने सांभाळावी मनाच्या कोप-यात जतन करावी. काही श्रीमंत लोकांच्या घरात जिवंत शोभेच्या बाहुल्या असतात. आप आपला दर्जा सांभाळण्यात दंग आणि आजुबाजुचे अजिबात भान नसणा-या शोभेच्या बाहुल्या. कधीतरी त्यांना वास्तवाची जाणीव व्हावी किंवा स्वत:ची  वेगळी ओळख निर्माण करावी ही अपेक्षा.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव