अनुत्पादक मालमत्ता
अनुत्पादक मालमत्ता म्हणजे ज्याद्वारे कोणतीही नविन प्राप्ती होऊ शकत नाही
किंवा कालपरत्वे कमी होत जाणारे मालमत्तेचे अधिमुल्य ( उपयोगिता आणि आर्थिक
मुल्य). आर्थिक विश्वात स्थावर मालमत्ता असणे
खूप महत्वाचे असणे. खेळते भांडवल आणि स्थावर मालमत्ता कोणताही
व्यवसाय चालण्यासाठी महत्वाचे असते. पुर्वी मुलगी देताना मुलाच्या
पगारापेक्षा मोठे घर, जमीन, सोने,
नाणे बघून देत असत. हळूहळू हे कमी झाले.
अजूनही गावची संपत्ती एक जमेची बाजू समजली जाते. योग्य आहे म्हणा ते !
काही ठिकाणी जशा बॅंका, इतर आर्थिक व्यवहार करणा-या संस्थांना या अनुत्पादक मालमत्तांमूळे भुर्दंड सोसावा लागत आहे.
या मालमत्तांमधून काही प्रमाणात लाभ मिळत असला तरी कालांतराने मालमत्ते
मधील भांडण तंटा आणि व्यवर्हायता लक्षात घेता. डोंगर पोखरून उंदीर
काढल्या सारखे होते. त्यामुळे या अनुत्पादक मालमत्तांचे करायचे
काय हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
सर्वसामान्य नागरिकांना यात काही
रस नसतो. वाडवडीलांची मालमत्ता जपायची म्हणुन ठेवलेली असते.
विकायला काढली तर अनेक अनाहुत हिस्सेदार पुढे येणार. राहू दे तशीच अशा अनेक मालमत्ता ना देय अवस्थेत पडून आहेत. ज्यामूळे ना त्यांचा काही उपयोग होत. ना त्याच्यातुन
काही उत्पन्न मिळत. जागा अडवली जाते. गावात तसेच शहरात अनेक जागा / बंगले “ना दावा” (Unclamed) प्रकारात पडून
असतात. सरकारही या बाबींमध्ये लक्ष घालू शकत नाही. वर्षानुवर्ष न वापरता ठेवल्यास त्याचे पडीक अवस्थेत रुपांतर होते. मग करायचे काय ?
वेळीच सावध होऊन त्याचे मुख्यतार
पत्र किंवा इच्छापत्र तयार करुन नोंदणी करणे. अनावश्यक असल्यास
लगेच विकून किंवा विकायची इच्छा नसल्यास काही तरी विधायक कामासाठी जसे की शाळा,
ग्रंथालय, दवाखाना, धर्मशाळा
किंवा भाडे मिळत असल्यास त्याचा वापर करणे. एक किंवा अधिक मोकळी
जागा असल्यास त्याचे रुपांतर आमराईत किंवा सुंदर उद्याना रुपांतर करणे. काहीच नाही झाले तर पटांगण, रंगमंच व इतर उपक्रम वापरण्यास देणे आणि कुणी वारस नसल्यास सरकारला किंवा धर्मदाय
संस्थाला मालकी देणे.
आपल्या घरातसुद्धा
अनेक अशाच अनुत्पादक वस्तू माळ्यावर किंवा अडचणीच्या जागी वर्षोनुवर्षे पडून असतात.
जर त्या वेळीच गरजू माणसाला दिल्यास सत्पात्री दान होईल आणि
अनुत्पादक वस्तुंची अडगळ कंमी होईल.
रहात्या घरावर बॅंकेमार्फत “उलट तारण”
(“Reverse Mortgage” ) या योजनेचा फायदा घेऊ शकता. ज्याद्वारे म्हातारपणी मालमत्तेचा उपभोग घेऊन तुमच्या गरजा स्वत:च्याजीवावर
भागवू शकता. वेळ ही सुद्धा
एक संपत्ती आहे. तिचा योग्य वापर करणे हे ही एक आव्हान असते
अन्यथा वाया गेलेला वेळ ही एक “अनुत्पादक मालमत्ता ठरते”
Comments
Post a Comment