नमस्काराचे महत्व

          नमस्काराची महती आपल्याला अनेक पातळीवर जाणवते. नवीन ओळख करून देताना, आदर दाखविण्यासाठी, देवासमोर किंवा जेष्ठ मंडळींना मान देण्यासाठी सुरूवातीला आणि शारिरीक स्वास्थ राखण्यासाठी या नमस्काराचा उपयोग होतो. अशा या नमस्काराचे महत्व अनेक अर्थाने आहे. शास्त्रीय, मानसिक भावनिकदृष्ट्या नमस्कारासाठी वाकल्यानंतर नकळत आशिर्वाद किंवा चांगले शब्द उच्चारले जातात. त्यामुळे दोघांचाही फायदा होतो. दोन्ही हात जोडल्यामूळे जी कंपने तयार होतात त्यामुळे एक नवीन उर्जा निर्माण होते. सकारात्मक विचार तयार होतात. व्यायामाचा एक प्रकारसाष्टांग किंवा सुर्य नमस्कारज्या द्वारे पूर्ण शरीर लवचिक बनतेदेवासमोर साष्टांग नमस्कार घातल्यास देव प्रसन्न होतो असा समज आहे.

          पुर्वीच्या काळी अनेक वरदान केवळ नमस्कार केल्यामूळे प्राप्त व्हायची.  कधीकधी माफी मागण्यासाठी नमस्काराचा उपयोग होतो. आमच्याकडे गावाहून आल्यावर, गावी निघताना, रोज सकाळ-संध्याकाळ आई-वडिलांना किंवा घरात जे कोणी मोठे असतील त्यांना नमस्कार करायची पध्दत होती. एखादे नवीन कामाची सुरुवात करतानासुद्धा देवाला आणि मोठ्या माणसांना नमस्कार करुन आशिर्वाद घेतले जात असत. आता  ही पध्दत लोप पावत चालली आहे.  वाकणे जिथे कमीपणाचे समजले जाते तेथे नमस्कार काय करणार ?

           करोनाच्या काळात हस्तांदोलन किंवा गळाभेट टाळण्यासाठी नमस्काराचा पर्याय पाश्च्यात्य देश वापरू लागले. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या नमस्काराच्या पध्दती आहेत. परंतू शास्त्रीयदृष्ट्या आणि फलदायी स्वरूपात भारतीय पध्दतीचा नमस्कार जास्त योग्य आहे असे मला वाटते. शालीनता, सौजन्य आणि आंतरिक सौंदर्य जे एका नमस्काराने साध्य होते. एकाने नमस्कार केल्यावर दुस-याला नकळत थोडेसे लवून प्रतिसाद द्यावा लागतो किंवा नमस्कारासाठी हात जोडावे लागतात. पत्रात सप्रेम किंवा साष्टांग नमस्कार लिहील्याशिवाय पत्राची सुरूवात होत नाही. अशा या नमस्कार करण्याच्या संस्कृतीचा आपण मान राखला पाहिजे. नम्रतेने अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव