व्यक्त होणे

 


          सामाजिक माध्यमातून अनेकजण / जणी व्यक्त होत असतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत कोणी ना कोणी व्यक्त होत असते.  विनोद, कविता, शुभेच्छा,  लेख, मते, टीका, लघुकथा,  संदेश, दृकश्याव माध्यमे (Video / Audio), अलक कथा अशा अनेक बाबींचा सारखा भडिमार चालूच असतो. कधी कधी कंटाळा येतो, वेळही वाया जातो. चित्रकार, लेखक, भाषण, अग्रलेख, मुलाखत, मासिक, पुस्तके, किर्तन, प्रवचन, रेडीओ, दूरदर्शन अशी अनेक माध्यमे पुर्वी होती यामागे अभ्यास, नीति आणि तत्वे यांची बांधिलकी असायची.

          पूर्वी व्य्क्त होण्यावर काही मर्यादा असायच्या. भाषा,  लिखाण, प्रसिद्धी, बोलणे आणि वेळ काळाच्या इत्यादी.  आता डिजिटल क्रांती युगात एक बोटाच्या क्लीकवर सगळे काही शक्य होते.  आता टाचणी पडली तरी लगेच त्याचा परिणाम / आवाज, प्रतिक्रिया सगळे काही माहिती ताबडतोब प्रत्येकाला कळते.

        कोणीही, काहीही, कशीही माहिती शहानिशा करता पसरवत असते. सहज नि:शुल्क होणा-या अमर्याद जलद होणा-या प्रसारणामूळे समाजात कधी कधी गैरसमज, मानहानी, ताण तणाव निर्माण होण्यास कारणीभूत ठरते. अमर्याद शक्तीचा किंवा तांत्रिक प्रगतीचा आपण कधी कधी गैरवापर करतो असे वाटते. प्रत्येक गोष्ट जशी फायदेशीर असते तसेच अतिवापरामुळे घातकसुद्धा ठरू शकते. व्यक्त होणं ही प्रत्येकाची मानसिक, भावनिक आणि आत्म्याची गरज असते परंतू संयम आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवल्यास चांगल्या कामाचा किंवा व्यक्तीचा कर्तृत्वाचा सगळ्यांना माहिती होणे यासाठी हे एक आवश्यक माध्यम ठरू शकते. नाहीतर अती झाले आणि हसू आले” असे व्हायला नको इतकेच!  व्यक्त झाल्यानंतर विशेषत:  कलाकार आपली कला मेहनतीने सादर केल्यानंतर त्यांना रिकामपणाची किंवा एकटेपणाची अनुभूती जाणवते पण ते सर्व अल्प काळापुरते असते. पुन्हा ते नवीन जोमाने नवीन सुरूवात करतात स्वत:ला व्यक्त होऊ पहातात. हे चक्र चालूच रहाते आणि रहावे हीच अपेक्षा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव