उपायापेक्षा बचाव बरा!
सध्याच्या करोनाच्या कालावधीत ह्याचा अनुभव घेतला असेल. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यत बचाव चालूच ठेवायचा असतो. असे अनेकवेळा अनेक बाबीमध्ये घडते.जेव्हा एखादी समस्या सुटत नाही तेव्हा तात्पुरती आपण ती बाजूला ठेवतो. कालांतराने यावर आपोआप उपाय सुचतो. शक्यतो समस्या उदभवूच नये असे प्रयत्न करायला हवेत. शारीरिक किंवा मानसिक आजार उदभवण्याची अनेक कारणे असू शकतात. उपायही सापडत नसतो आणि समस्या सुटतील असे वाटत नसते. यावेळी एखादा तिसरा माणूस त्रयस्थपणे विचार करून मार्ग सुचवू शकतो. आपण कुणाची मदतच घ्यायची नाही असे ठरवले तर कठीण होऊन बसते. सगळी खबरदारी घेऊनही समस्या उद्भवतात तेव्हा आपला नाईलाज असतो. आपण मानसिकरीत्या सक्षम असल्यास कोणतीही अडचण जास्त टिकत नाही. पाण्यात पडले की आपोआप पोहता येते असे काही जण म्हणतात. जोपर्यंत पाण्याचा, खोलीचा अंदाज येत नाही तोपर्यंत हातपाय मारावेच लागतात. एकदा हा अंदाज आला की पोहणे एक चांगला आनंद देवून जातो.
नवीन सून जेव्हा घरात येते तेव्हा तिला रुजायला, रमायला वेळ लागतो.त्यासाठी लागणारा वेळ देणे जसे आवश्यक आहे तसेच तिला समजून घेणे कधीही हितकारक ठरते. एकूण आयुष्य
हे आक्रमक, कधी बचाव, कधी माघार घेऊनच (जिथे आवश्यतेनुसार) जगावे लागते. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत हीच भुमिका कमी अधिक प्रमाणात अशीच असते. किंबहुना अशीच असावी ही अपेक्षा. ज्या ठिकाणी उपाय करणे शक्य नाही तेथे
बचाव करणेच अपेक्षित असते. मोठे वादळ,
पाऊस, वारा आल्यानंतर आपण आधी आसरा शोधतो ना!
नाहीच मिळाला तर भिजण्याशिवाय पर्याय नाही. काही घटना अशा असतात ज्या आपण टाळू
शकत नाही. शांत बसणे आणि योग्य संधी मिळाल्यावर त्यातून बाहेर पडणे
हेच खरे योग्य ठरते. कार्यालयात किंवा कोणतेही मोठे निर्णय घेताना “उपायापेक्षा
बचाव बरा” या मार्गाचा कधीकधी अवलंब करावा लागतो जसे की काश्मिर प्रश्न, सीमा तंटा
जे अनियमित काळापासून प्रलंबित ठेवले जातात.
Comments
Post a Comment