मुली येती घरा, तोची दिवाळी दसरा
मध्यंतरी व्हॉटसअपवर “एकतरी मुलगी असावी” अशी कविता आल्यावर मला माझ्या भाग्याचा हेवा वाटला. देवाने मला दोन मुली दिल्या. आज दोघी बाहेर असल्या तरी त्यांचे बालपण, शाळा, कॉलेज, नौकरी, त्यांच्या स्वभावातील विरोधाभास असा 27 वर्षापुर्वीचा इतिहास डोळ्यासमोर उभा रहातो.
जेव्हा पहिली मुलगी झाली तेव्हा बाबांपासून
सगळे नातेवाईक खूशीत होते. हळूहळू तिच्या बाळलीला आणि आजोबांशी मैत्री यामूळे दिवस
कसे गेले ते कळले नाही. बाबा आणि आजोबांचा तिला जास्त लळा होता. “एकसे
भले दो” या न्यायाने दुसरा चान्स घेतला आणि मुलगी म्हणून पुन्हा एक परी जन्माला
आली. बरेच जण मोठया मुलीला माझ्या सासूसारखी आणि दुसरीला माझ्या आजीसारखी आहे असे
म्हणतात.
दोघे एकमेकांना सांभाळून घ्यायच्या,
तशाच भांडणपण करायच्या. शाळेत जाताना, खेळायला जाताना 4 वर्षाचे अंतर असूनही
दोघी एकत्र जायच्या आणि लोकांना दोघी मैत्रीणीच वाटायच्या. मोठ्या
झाल्यावर हळूहळू आवडीनिवडी, रहाणीमान, दिसणे यात नकळत फरक पडू लागला. त्यामूळे दोन
वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे दर्शन आपोआपच घडू लागले. तसेही मी नौकरी करत असल्यामूळे
त्यांना एकटे घर सांभाळायची आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची सवय होती. आजोबा
गेल्यावर काही दिवस त्यांना एकएकटे वाटत होते, नंतर त्या सरावल्या.
असे होता होता दोन्ही मुली मोठ्या कधी झाल्या
ते कळले नाही. आता शिक्षण आणि नौकरीसाठी मुली पंख फुटून बाहेर उडाल्या. बघता बघता कधी
स्वत:च मोठ्या जबाबदा-या घेऊ लागल्या तेही कळले नाही.
आता कधी तरी येतात,
तेव्हा त्यांच्या चिवचिवाटाने घर भरून जाते. पुन्हा आम्ही एकदम अनामिक आनंदाने
लहान होतो आणि त्यांच्या आनंदात सर्वकाही विसरुन जातो. “नाहीतरी मुली परक्याचे धन” असे म्हणतात, ते आम्हाला लवकर अनुभवायला मिळाले. त्यांच्यात आपआपसात
कायम सौख्य राहो ही इश्वर चरणी प्रार्थना.
आजकाल मुलगाही परक्याचे धन असल्याचा फिल येतो, कारण मुलगाही शिक्षणासाठी लहान वयात परदेशी जातो. बाकी तुमच्या दोन्ही मुली गोड आहेत
ReplyDeleteधन्यवाद🙏
Delete