श्रमसाफल्य

                जगात सगळ्यात कमी कमावणारा असेल तर तोश्रमीक” ( मजूर, सफाई कामगार, वॉर्डबॉइज, बांधकामावरचे मजूर ) त्यांच्या श्रमा इतका मोबदला त्यांना कधीच मिळत नाही. त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा नाही, त्यांच्यात एकजूट नाही. परंपरागत त्यांच्या कामाचे मुल्यमापन कमी केले गेल्यामूळे कायदे असूनही पाळले जात नाहीत.

          एका बंगल्याचे नावश्रमसाफल्यहोते. खरंच, किती योग्य नाव दिले होते त्या माणसाने!  गरिबीतून जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर श्रीमंत होतो आणि हा माणूस स्वत:चा बंगला बांधतो. त्यांनी आजपर्यंत केलेल्या श्रमाचे चीज झाले म्हणून श्रमसाफल्य नाव दिले असावे. असे अनेकजण अनेक प्रकारचे श्रम करीत असतात. सर्वांच्या श्रमाची किंमत किंवा जाणीव असतेच असे नाही. लहानपणीविनूचे बीलही गोष्ट मला नेहमी आठवते. कोणताही मोबदला घेता केवळ प्रेमाने सर्व करणारी आई आणि छोट्या छोट्या कामाचा बील लावणारा तिचा मुलगा विनू.

            अनेकदा आपण घेत असलेल्या श्रमाची जाणीव आपल्यालाच नसते तर ती दुस-याला कशी असणार? श्रमप्रतिष्ठा हा मुद्दा किंवा दृष्टिकोन आपल्याकडे नसतो. आपण हाताखालच्या माणसांशी कसे वागतो यावरून आपली प्रतिष्ठा ठरते. या उलट कधी कधी काही कामगार अनावश्यक गैरफायदा घेणारेही असतात. परदेशात  श्रमाची किंमत ठेवली जाते. तिथे उच्च-निच असा भेदभाव केला जात नाही.

           अशा श्रमांचा मान राखण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे कारण सगळी कामे सगळ्यांना करणे शक्य होणार नाही. “जेणू काम तेणू थाय, बिजे करो तो गोता खायअशी एक म्हण आहे. कोणतेही काम हलके समजू नये. त्यांना योग्य तो मोबदला प्रतिष्ठा दिली पाहिजे.

          हल्ली कंत्राटी पध्दतीने मजूरांची नेमणूक केली जाते. परंतू त्यांची आरोग्य विषयक काळजी जसे की विमा संरक्षण, प्रशिक्षण, सुरक्षितेबाबतची काळजी आणि कामाचा योग्य मोबदला देणे अपेक्षित आहे. हल्लीच्या यांत्रिक युगात श्रमिकांची आवश्यकता दिवसें दिवस कमी होत आहे. तरी श्रमिकांची ते करत असलेल्या कामांची योग्य ती जाणीव ठेवली गेली पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव