आमचे अण्णा
लग्न ठरल्यावर पहिल्यांदा मैत्रिणींनी व बहिणींनी कौतुकाने सांगितले होते की, सासरी फक्त तुला सास-यांना सांभाळायचे आहे. दुसरे कोणी नाही, मजा आहे बुवा तुझी!
मनात थोडी
धाकधुक होतीच! पण पहिल्याच दिवशी अण्णांनी स्वयंपाकघरात नेऊन मला
सगळे व्यवस्थित समजावले त्यामुळे मनातली धाकधुक तर कमी झालीच परंतू दडपणही कमी
झाले. तसेही लग्नात पाठवणी करतांना काळजी करणा-या माझ्या
आई-वडीलांना तुमच्या मुलीला “मुली सारखे सांभाळीन” असे सांगुन अण्णांनी अर्धे मन
जिंकले होते. ते नाते त्यांनी शेवटपणे
सांभाळले.
15 वर्षाच्या त्यांच्या सहवासात
त्यांच्या अनेक पैलूंचे दर्शन घडले. शिस्त, वेळच्या वेळी कामाचा उरक, कोणत्याही
कामाला कमीपणा समजायचा नाही, पुरूष-स्त्री भेदभाव न करता सगळी कांमे आली पाहिजेत.
ते स्वत: सगळी कामे करत असत. आम्ही दोघे नौकरी निमित्त घराबाहेर असल्याने ते
परिश्रमपुर्वक दोन मुलींना वाढवणे, खाणे-पिणे सांभाळणे इत्यादी सर्व गोष्टी आवडीने
व काळजीपोटी करायचे.

Comments
Post a Comment