मनाची शक्ती

       सगळ्यात बुध्दिमान आणि मन असलेला प्राणी म्हणजे मनुष्य होय. या मनाच्या शक्तीच्या जोरावरच तर माणूस आकाशात उंच भरारी घेऊ शकतो. मनात आणले तर होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करू शकतो. म्हातारपण, आजारपण आणि इतर अनेक समस्या केवळ मन जिद्दी असेल तर सगळ्यावर मात करू शकते. म्हणतात ना नाण्याला दोन बाजू असतात. एक चांगली एक वाईट. वेळप्रसंगी कोण कोणावर मात करेल हे सांगू शकत नाही. म्हणून चांगल्या वाईटाचा सारासार विचार करण्याची देणगीसुद्धा माणसाला दिलेली आहे.

            हे सगळे असून -याच वेळा आपल्या मनात अनेक वाईट विचार येत असतात. अतिताण, आंधळे प्रेम, अविश्वास, संशय, अंधश्रध्दा आणि नकारात्मक विचार अनेक वाईट कामांना आकृष्ट करते. खून, मारामारी, भांडण, फसवणूक ही वाईट विचारांची परिणती होय. कधी परिस्थितीमूळे माणूस वाईट बनवते. तर कधी अतिलोभ, मत्सर, मोहमाया यामूळे तो इतरांचे वाईट इच्छितो. त्याही परिस्थितीतचिखलात कमळ उगवतेत्याप्रमाणे प्रतिकुल परिस्थितीतसुद्धा चांगली माणसे घडतात.

         अध्यात्म आपल्याला हे शिकवतेसुसंगती सदा घडो. सृजन वाक्य मुखी पडोम्हणजेच चांगली संगत आणि चांगले विचार नेहमी आचरण चांगले ठेवण्यास मदत करतात. मुलांचे अती लाड केले की मुले बिघडतात असे म्हणतात.  हे लाड  जाणीवपूर्वक सजग राहून केले तर कोणतीच मुले बिघडणार नाहीत. लहानपणचे संस्कार आयुष्यभर पुढे मार्गदर्शक ठरतात. म्हणून रामदास स्वामी म्हणतातमन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दीचे कारण”.  चांगल्या मनाने केलेली कामे नेहमीच यशस्वी होतात.

               मनाच्या शक्तीवर यशसुद्धा खेचून आणता येते. अनेक अवघड कामे इच्छा आणि योग्य प्रयत्नांच्या जोरावर पार पाडली जातात. “रेकी” आणि इतर अनेक घटकांद्वारे मनाच्या शक्ती प्रत्यय घेता येतो. अशा वेळी शाहरुख खानच्या सिनेमातील एक प्रसिध्द संवाद आठवतो “कहते हैं अगर दिल किसी चीज को चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है”  म्हणजेच आपली चांगली इच्छा आणि प्रयत्न बघून नियती माणसाला साथ देते. मनाची शक्ती कमविण्यासाठी तीन अक्षरी मंत्र महत्वाचा तो म्हणजे “स्विकार” जीवनाकडून काही अपेक्षा ठेवली नाही तर अपेक्षाभंग होणार नाही. आपोआप मनशांती राखली जाईल.  

 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव