पुनर्भेट (Reunion)

               Whatsup (काय सांगू अप्पा) मूळे सगळे जग एका क्लीकवर जवळ येत आहे. जूने मित्र-मैत्रिणी त्यांचे उद्योग, परिचय, अनुभव नवीन नवीन साहस, सोहळे, प्रसंग इत्यादी अनुभवता येतात. अशीच आमची नांदेडच्या शाळेची दहावी- 1981 ची बॅचच्या मैत्रींणींनी एकदा भेटायचे ठरवले. निमित्त होते एका मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाचे जवळजवळ 35 वर्षांनी आम्ही भेटत होतो. फोटोवरून साधारणपणे सगळेजण एकमेकांना ओळखत होतो पण प्रत्यक्ष भेटण्याची, बोलण्याची मजा काही औरच असते. आमची शाळा, बालपण आणि आताची परिस्थिती अशा सर्व विषयावर धमाल किस्से, गंमती-जमतींना अगदी ऊत आला होता. असे वाटत होते की, काळ तिथेच थांबावा संपूच नये. पुन्हा भेटण्याचे वचन देऊन नवीन ऊर्जेने आम्ही सर्व जण जड अंत:करणाने परतलो. कित्येक दिवस हाच विषय आणि फोटोंची देवाण घेवाण चालू होती.

          दुसरा किस्सा आम्ही सर्व बहीण, भाऊ, वहिनी आणि भावोजी एकत्र असेच जवळपास 30-35 वर्षांनी अलीबागला जमलो होतो. तेव्हा अशीच धमाल, मस्ती, गप्पा- गाणी, समुद्र, खेळ आणि मजा. खरंच असा ब्रेक सगळ्याना हवाहवासा असतो. दैंनंदिन काम, बांधिलकी यामध्ये एवढे गुंग असतो की आपण एकत्र जमावे भेटावे असे कितीही वाटले तरी कधी योग येत नाही किंवा व्यस्ततेमूळे वेळ मिळत नाही.

           वरील दोन्ही पुनर्भेटी (Reunion) मूळे हे भेटणे किती आवश्यक आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे मुले मोठी झाल्यामूळे आता या वयात थोडीशी मोकळीक काढणे सहज शक्य असते परंतू जो पर्यंत हे मनावर घेत नाही तो पर्यंत याचे महत्व कळत नाही. नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यात निवांतपणा हा सगळ्यांना हवा असतो. त्यात वेगवेगळे छंद,  प्रवास, निरुद्देश भटकणे यामूळे मनाची चांगली मशागत होते. -याच वर्षानी भेटल्यामूळे आधीच्या आठवणींना उजाळा मिळतो. नाते अजून दृढ होण्यास मदत होते. जगण्याला एक नवा आनंद मिळतो. ही उर्जा पुढे कित्येक दिवस पुरून उरते. पुन्हा परत भेटीचे वेध लागतात.  काही कारणाचे हरविलेली माणसे भेटल्यावर, दिर्घ आजारातून बरे झाल्यावर,  ब-याच वर्षाने परदेशातून आलेल्या नातेवाईकांना या पुनर्भेटीचा आनंद मिळून जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.

            काही ठराविक कालावधीने असे भेटणे मानसिक समाधान शांती देऊन जाते. मनावर चढलेला गंज मोठेपणाची झुल त्या निमित्याने थोडीशी बाजूला होऊन निखळ आनंद  उपभोगवयास मिळू शकतो.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव