करोना आणि बदलेला समाज

           साधारण 50 ते 55 च्या वयात असलेल्यांना या संकटाची कल्पना ना भुतो भविष्यती आली असेलच. 100 वर्षापुर्वी हे संकट येऊन गेले होते असे म्हणतात पण त्यावेळी लोकसंख्या आणि कमी दळणवळण कमी असल्यामूळे, आर्थिक व्यवहार आजच्या एवढे विकसीत झाले नव्हते. तेव्हाचे उपाय वेगळे असतील आणि आताचे वेगळे असतील.

           या करोनाने (मानवनिर्मित) सगळ्यांना घाबरून टाकून अगदी सळो की पळो करून टाकले आहे. कधी नव्हे ती घावणारी मुंबई थांबली आहे. सगळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकमेकांना बघणे, भेटणे, जाणे- फिरणे खाणे फिरणे, खाणे फिरणे सगळ्यावरच अघोषित बंदी आलेली आहे. कार्यालये, शाळा, कॉलेज, दुकाने, फेक्टरीज सगळे काही 6 महिने बंद करून एक प्रकारचा असहकारच सगळ्यांनी पुकारलेला आहे असे वाटते.

         एक चांगले झाले की, माणुसकी दिसायला लागली, एकमेकांसाठी काहीतरी करुया संकटावर मात करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधायला लागली. गरजूंसाठी धाऊ लागले. जेवण, सुके खाणे, मजूरी, वेतन यांचे वाटप होऊ लागले. निसर्गावर मात केल्याच्या आनंदात आपण आपले मुलभूत हक्क, शुध्द, हवा, पाणी याच्यावर सुध्दा अन्याय करीत होतो ते आता कमी व्हायला लागले. अवाजवी खर्च, श्रीमंतीचा बडेजाव आणि कामाचा ताण कमी होऊ लागला. घरी बसून आधुनिक तंत्रज्ञान ज्याची आधी एवढी गरज भासली नव्हती ती आता वाटायला लागली.

          वाढीव महत्वाकांक्षा माणूस बाळगतो आणि स्व:ताचे इतरांचे नुकसान होते हे आता ओळखू लागले सगळेजण कमीत कमी माणसे असले तरी समारंभ होऊ शकतात हे कळू लागले. बाहेरच्या खाण्यापेक्षा घरचा वरण-भात अधिक स्वस्त आणि आरोग्यदायी असतो हे मोठ्यांपासुन लहांनाना कळायला लागले.

आरोग्य सांभाळून शिस्त, संयम पाळणे किती आवश्यक आहे हे ही कळायला लागले. एवढी मोठी किंमत (जीवीत हानी आणि संपत्ती ) देऊन आपण काही गोष्टी नव्याने शिकलो. मात्र तेच नेहमीसाठी राखले तर -याच समस्या निर्माण होणार नाहीत हे नक्की.

           शासकीय कर्मचारी, डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी आणि इतर आवश्यक सेवा चालू राहिल्यामूळे आणि वेळीच निर्बंध लावल्यामूळे बरीचशी हानी टाळता आली हेही नसे थोडके. करमणूक, भटकणे जरी कंमी झाले तरी कौटूंबीक सुखाची चव सगळ्यांनी चाखली असावी. घरात जेष्ठ माणसे आणि लहान मुले यांची विशेष काळजी घेतली जावू लागली. त्यांनीपण गांभिर्याने स्थिती लक्षात घेऊन योग्य साथ दिली हे ही महत्वाचे. एकूण समाजाने सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन संकट हीच संधी म्हणून वापर केल्यास करोनावरची लस मिळेल आपण सर्व जण करोनामुक्त होऊ अशी आशा बाळगुया आणि तसे प्रयत्न करूया.

           फक्त हीच वाटचाल (साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ) नेहमीसाठी बाळगावी आणि योग्य ती खबरदारी घेऊन सुरक्षित राहून पुन्हा जोमाने नविन वर्षात नविन आव्हाने पेलुया आणि त्यासाठी समर्थ होऊ या.

 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव