संस्कार शास्त्राचे महत्व
संस्कार केले तर संस्कृती टिकेल!
संस्कृती टिकली तर धर्म टिकेल!
धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल!
-
अण्णासाहेब मोरे
व्यक्तीवर अध्यात्मिक संस्कार
करण्याचे ठरले तर ते बालवयात होऊ शकतात. ओल्या मातीतून मूर्ती घडविणे शक्य असते.
मोठ्या मुलांवर, व्यक्तींवर संस्कार करणे ही अवघड,कष्टाची व विलंबदायक अशी बाब
आहे. बालवयातील संस्कारांमूळे त्या बालकाचे भावी जीवनच पूर्णपणे बदलून जाते. बालक
भावी जीवनात आशावादी, आत्मविश्वासू,
निर्भयवृत्तीचे, परोपकारी,
मातृ-पितृभक्त, सहनशील, संयमी, उद्योगी, समाजभूषण, दृढनिश्चयी, श्रध्दावान, जीवनात
नित्य यशस्वी अशा व्यक्तीमत्वाचे होते.
संख्याशास्त्र, हस्तरेशाशास्त्र,
ज्योतिषशास्त्र, स्वरशास्त्र, वास्तूशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, कर्मकांडशास्त्र,
इत्यादी सर्व प्रकारचे शास्त्रांचे वर्ग, साहित्य इत्यादी उत्सूक मंडळी ज्ञान
मिळवित असतात. माझ्या मते, वयाच्या 5 वर्षापासून प्रत्येक 10 वर्षांनी संस्कार-शास्त्राचे
शिक्षण देणे गरजेचे आहे. ज्यामूळे जीवनातील समस्यांचे निराकरण तर होईलच शिवाय जीवन
कष्टमय होणार नाही याकडे लक्ष पुरविले जाईल.
मध्यंतरी
उन्नती गाडगीळ लिखीत मुंजीबाबत आणि गरोदर महिलेचे समुपदेशनाबाबतची उपयुक्त माहिती
मिळाली अशी उपयुक्त माहिती जर सर्वाना मिळाली तर राम-कृष्ण कोण? पसायदान म्हणजे
काय? ज्ञानेश्वर कोण होते? असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. निदान महाराष्ट्रात
तरी उच्च परंपरा, संत साहित्य मराठीतून उपलब्ध असल्यामूळे इंग्रजी माध्यमातील
मूलांना त्याचा गंधही नसतो. शाळेत वयाच्या 5 वर्षी मुल्य-शिक्षण, ज्यामध्ये निती
कथा, इतिहास, देशप्रेम आणि अध्यात्म या अनुषंगाने गप्पा, गाणी, गोष्टी, खेळ
इत्यादी मधून कळत न कळत बालमनावर संस्कार केले जाऊ शकतात. वयाच्या 10व्या वर्षी
सैनिकी शिक्षण सूरु केल्यामूळे शिस्तबध्दता, देशप्रेम आणि कष्टाची शाररिक व मानसिक
तयारी होऊ शकेल. सध्याच्या शिक्षण पध्दतीत मुल्यवर्धीत
शिक्षण, नागरिक शास्त्र या गोंडस नावाखाली थोडेफार शिकवले जाते परंतु ते तेवढे
पुरेसे नाही आणि हळुहळु मुले विसरून जातात. त्याची पुन्हा ठराविक काळाने उजळणी
होणे गरजेचे आहे.
प्रेम, स्नेह, बंधूभाव, जबाबदारीची जाणीव, मदत करणे, मोठ्यांचा
आदर राखणे, अशा अनेक गोष्टी असतात ज्या लहान वयात शिकवल्या तर जास्त लक्षात राहतील.
पुर्वी हे काम संयुक्त कुटूंब पध्दतीमूळे मोठ्याच्या अनुकरणातून किंवा सांगण्यातून
आपोआप मिळत होते. आता, ते काही शक्य नसल्यामूळे ही जबाबदारी एकतर शाळा किंवा संस्कारवर्ग
या दोघांकडून पुरी होण्याची अपेक्षा आहे. आई-वडीलांनी या कामात हातभार लावल्यास
उत्तम. पण कळीचा मुद्दा येथेच निर्माण होतो की, मुळात आई-वडीलांना संस्काराची
माहिती आहे का? चांगले संस्कार मोठेपणी
अनेक समस्याना तोंड देण्यासाठी ते सक्षम बनतील. हल्ली सगळे काही नेटवर मिळते असा
एक विश्वास बहुतेकांना असतो. पण आज समाजमाध्यम्यातून योग्य मार्गदर्शन मिळते का?
त्यासाठी स्वत:ला निदान पाया तरी माहीत असणे महत्वाचे असते.
छान कथा
ReplyDelete