पोटासाठी काहीही ..
चाणक्याने लिहून ठेवले आहे “जेव्हा एखादी भुकेली व्यक्ती भाकरीसाठी चोरी करताना सापडते तेव्हा त्याबद्दल देशातील लोकांना लाज वाटली पाहिजे” या वक्तव्याला कित्तेक शतके उलटून गेली तरी अजूनही परिस्थितीत सुधारणा दिसून येत नाही. आजही जगात काही ठिकाणी कित्येक जण उपाशी, अर्धपोटी किंवा कुपोषित लोकांचे मोठे प्रमाण आढळते. याला जबाबदार कोण ? ते स्व:ता? परिस्थिती? सरकार? की भोवतालचा समाज ?
सर्व सजीवांना पोट असते आणि आपआपल्या परीने त्याची ते सोय लावतात. परंतू माणूस मात्र हवास्यापायी धान्याचा अतिरीक्त साठा करतो व कृत्रिम टंचाई होऊन इतरांना वंचित ठेवतो. “चोच देणार तो चारा देणार” अशी म्हण होती. परंतू असे किती दिवस दुस-यांवर अवलंबून रहाणार? स्व:ता, शेतकरी, शासन व समाज यांच्या एकत्रित प्रयत्नाने सर्वोंचे “उदर भरण करणे” शक्य होईल.
एकीकडे अशी परिस्थिती तर दुसरीकडे खाण्यासाठी जगणारी माणसे पण आहेत. जीभेचे वेगवेगळे चोचले, जे कधी कधी आरोग्यासाठी अहितकारक असतात तरी आवडतात म्हणून खाणारे त्यांची संख्यापण खूप आहे. सकस, ताजे आणि वेळेवर अन्न खाणे हा निसर्गाचा नियमसुध्दा आपण आपल्याही नकळत पायदळी तुडवतो आणि अनारोग्याला आमंत्रण देतो. एकतर शुध्द हवा, पाणी आणि अन्न हे दिवसेदिवस दुर्लभ होत चालले आहे. दुसरीकडे ज्यांना सहज अन्न मिळते त्यांना त्याची किंमत नसते म्हणून त्याची नासाडी, अनावश्यक साठा, पुरवून खाणे (फ्रिजमधील शिळे अन्न, फ्रोजन) अशा घातक सवयीमूळे आपणच आपले नुकसान करतो असे वाटते.
अशावेळी “थोडे खा पण सकस खा” जे आपण लहानपणी शिकलो होतो. ते पुन्हा चळवळरुपी आंदोलनाने सुरू करावी लागेल असे वाटते. “शांतीचा मार्ग पोटातून जातो” असे म्हणतात. पोट भरलेले असले की डोके शांत, डोके शांत असले की निर्णय क्षमता, उत्साह आणि रहाणीमान यावर नक्कीच सकारात्मक परिणाम घडवितो.
मग काय “वेळच्या वेळी योग्य ते खाऊन शांती व समाधान राखणार ना?
छान कथा
ReplyDeleteDhanyawad🙏
Delete