पित्रृऋण

          फार वर्षापूर्वी सुधा मुर्तीची "पित्रृऋण" ही कादंबरी वाचली होतीवडिलांचे राहिलेले कर्तव्य मुलगा वडिलांच्या अनुपस्थितीत  पार पाडतो. "छोटा बाप"म्हणून एका चित्रपटात छोटा भाऊ बहीणीचे लग्न करून देऊन बापाचे कर्तव्य पार पाडतो. “पित्रऋण म्हणजे ज्या वडिलांनी आपल्याला या जगात आणले, ज्यांच्याशिवाय आपले अस्तित्वच शक्य नाही, त्यांचे आपल्यावर असलेलें उपकार म्हणा किंवा ऋण म्हणा ते काही अंशांनी परतफेड करणे प्रत्येक मुला-मुलीचे आद्य कर्तव्य आहे. आई वडिलांचे संस्कार, मेहनत, प्रेम मुलांकडून पुढे संक्रमित करणे, त्यात स्वत:ची भर घालून वाढ होईल असे वागणे अपेक्षित आहे. जेव्हां स्वत: कमविण्यासाठी वणवण करावी लागते तेव्हा वडिलांचे महत्व कळते.

           पुर्वी हे पिढय़ा पिढय़ा बिनधोकपणे चालत असें. आता  विभक्त कुटुंबांत हे शक्य करण्याकरता विशेष प्रयत्नं करावे लागतील. गांव सोडून आल्यानंतर गांवकरी किंवा तिथल्या वास्तुचेसुद्धा आपण ऋणी असतो. हे पित्रऋण फेडण्यासाठी अनेक मार्ग आहेत. गांवच्या लोकांस मदत करणे, त्यांच्या अडीअडचणीं सोडविणे, पारंपारीक व्यवसायांना हातभार लागेल असे बघणे, गांवच्या वृध्द लोकांस आर्थिक मदत करणे, आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग करून गावकऱ्यांची प्रगती कशी होईल यासाठीं प्रयत्न करणे. पितृत्वाच्या नात्याने काही संस्था, उद्योग, उभारलेले असतात, त्यांचे संवर्धन करणे, धुरा सांभाळणे, इत्यादी अनेक मार्गानी आपण हें पित्रृऋण फेडू शकतो.

             अनेक ऋणापैकी पित्रऋण हे महत्वाचे असते. जरी पुर्ण फेडता आले नाहीतरी अंशत: आपण त्यांचे विचार, कृती आणि संस्कार जे आपल्याला मिळाले ते तरी पुढच्या पिढीकडे पोहोचवणे, त्यांचे नांव उज्वल नाही करता आले तरी निदान बदनाम होऊ नये याची काळजी घेतली तरी खूप झाले. वडीलांनीपण थोडे स्वार्थी, काळानुसार बदलण्यास हरकत नाही. जोपर्यंत स्वत: जीवंत आहोत तोपर्यंत तरी सर्व हक्कांचे हस्तांतरण भावनेच्या भरात करु नये. मरणोपरांत मात्र इच्छा आपल्या मृत्यूपत्राद्वारे व्यवस्थित नोंद करुन ठेवावी, जेणेकरून भविष्यात कोणालाही त्रास होऊ नये.

            बागबान, संध्याछाया या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे मुले जशी बदलतात, तसे आई-वडिलांनीपण बदलावयास हवे. अगदीच कोरडेपणा नसावा, योग्यवेळी नक्कीच मदत करावी पण त्याची जाणीव जर मुले ठेवत नसतील तर ती करुन देणे हेही एक कर्तव्यच असते. आभाळाची माया मिळावी पण त्यांचा अधिकार गृहित धरला जाऊ नये. अहो बाबापासुन आता अरे बाबापर्यंतची मजल आताच्या बाबा लोकांनी गाठलेली आहे, त्याचीच पुढची पायरी समजून मुलांना विश्वासात घेऊन सर्व व्यवहार केल्यास तसे दोघांनाही सोपे होईल. विशेषत: मुलींच्या बाबत जास्त हळवे होऊन कोणतेही निर्णय घेऊ नयेत.

           मध्यंतरी दोन मुली असलेल्या मुलीच्या वडिलांना बरे नव्हते म्हणून भेटायला गेलो होतो, तेव्हा त्याचे बोलणे अंतर्मूख व्हायला झाले. मला तंदूरस्त रहावेच लागेल, उद्या जावयांना त्रास नको, म्हणजे सुना असल्या तर त्रास देणार होतो, असे समजायचे का? आताच्या परिस्थितीत कधीही तंदुरुस्त रहाणे योग्यच पण नंतरचे विचार मला पटले नाहीत. जशा सुना काळजी घेतात तशी जावयांनीपण घेणे त्यांचे कर्तव्य ठरत नाही का? हे ही संस्कार आता मुला-मुलींवर झाले पाहीजेत.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव