भेटवस्तू आणि आपण

           दिवाळीचे मुख्य आकर्षण हे एकमेकांना शुभेच्छा देणे, भेटवस्तू देणे, निरनिराळ्या वस्तूंची खरेदी करणे आणि फराळावर ताव मारणे हे असावे. आपण उत्सवप्रिय, वस्तू देण्याची-घेण्याची जास्तच मजा घेणारे आहोत म्हणून असावे. शुभेच्छा कार्ड, दिनदर्शिका, डायरी, पेन, दिवाळी अंक, सुका-मेवा, मिठाई इत्यादी अशा अनेक स्वरुपात भेटी या मिळत असतात. आता जागतिकीकरणात अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवितात आणि ग्राहक त्याला आकर्षित होतात. आई-वडील, मुले, मित्र-मैत्रिणी, कार्यालयीन सहकारी, नातेवाईक, असे अनेक जण या सणाच्या निमित्याने भेटवस्तू देत आणि घेत असतात. मला भेटवस्तूंचे आकर्षण अजूनही आहे. लहानपणी दिवाळीला पुस्तक, ड्रेसचा कपडा किंवा पैसे भेट मिळायचे. आता मात्र मला भाऊबिजेला वेगवेगळ्या वस्तू मिळतात त्यामूळे ती उत्सुकता कायम असते.

         प्लास्टिकची आकर्षक फुले, लाकडी झाडे, विविध प्रकारची भांडी, चादरी, शोभेच्या वस्तू इत्यादी.. वस्तूंनी बाजारपेठ नुसती ओसंडून वाहत असते. आपणच आपले बजेट पाहून खरेदी करावयाची.

काही लोक मात्र या दिवाळीचा आनंद दुस-यांना कसा देता येईल याचा विचार करून गरीबांना कंदील वाटणे, कपडे, खाऊ, पुस्तके फराळ वाटतात. त्यांच्या आनंदात आपला आनंद मानतात. सैनिक, पोलिस डॉक्टर या सणासुदीच्या काळात कर्तव्य बजावत असतात म्हणून त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणारी लोक आहेत. खरतर भेटवस्तू देणे घेणे एक निमित्त झाले सण साजरा करण्याचे. त्या निमित्याने माणसे एकमेकांना भेटतात सुख दु:खाच्या गोष्टी बोलतात. काही क्षण भेटल्याचा आनंद मिळवणे हे महत्वाचे. अनाथाश्रम, वृध्दाश्रम यांना आपुलकीची भावना खुप काही देऊन जाते.

             आपण सगळे जण एक निश्चय करूया, दिवाळीचा खरा अर्थ जाणून घेऊन तशी साजरी करूया. यावर्षी नेहमी सारखी घाई-गडबडीची दिवाळी नसावी. शांततेत, प्रदुषणमुक्त वातावरणात आपआपल्या घरी सुरक्षिततेचे नियम पाळून साजरी करू

 

  

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव