एसटी - लालपरी

               “प्रवाश्यांच्या सेवेसाठी असे घोषवाक्य असलेल्या एसटीची बातमी आजच पेपरमध्ये वाचली. एसटी संकटात, 105 कर्मचारी करोनाने दगावले, हे वाचून वाईट वाटले. करोना काळातील एसटी कर्मचा-यांचे योगदानसुध्दा महत्वपूर्ण आहे. मागच्या वर्षी संपुर्ण टाळेबंदीच्या कालावधीत जेव्हा लोकलसुध्दा बंद होत्या तेव्हा केवळ एसटीमूळे अत्यावश्यक सेवेमधील कर्मचा-यांचे जाणे-येणे सुलभ झाले, शिवाय एसटीतील कर्मचा-यांनी अनेक प्रवाश्यांना शहरातून मूळ गावी पोचवले. अन्यथा फार कठीण होते. अशा या एसटीला जेव्हा लाल डबा म्हणून हिणवले जाते तेव्हा खूप वाईट वाटते.

              खरं म्हणजे, गावात एसटी खूप लोकप्रिय आहे. जिथे रेल्वे जाणे शक्य नाही तेथे एसटी बस जाते असे म्हणणे जास्त सोइस्कर ठरेल. कोणत्याही रस्त्यावर, निर्जन जागेत, नफा तोट्याची गणित मांडता, स्वस्त आणि मस्त अशी अविरत सेवा देणारी एसटी. आता, साधी, निमआराम, वातानुकूलीत अशा वेगवेगळ्या वर्गांसाठी एसटीने सेवा उपलब्ध केलेल्या आहेत. स्वातंत्र्य-सैंनिकांचे कुटूंब, शाळेत जाण्या-या विद्यार्थ्यांसाठी, मुलींसाठी, जेष्ठ नागरीकांसाठी सवलतीच्या प्रवासाचा फायदा दिला जातो. अनेक शासकीय/ खाजगी कंपनीचे कर्मचा-यांसाठी, उत्सव प्रसंगी एसटीची सेवा घेतली जाते. चालक आणि वाहक यांना गावात खुप मान असतो. या क्षेत्रातसुध्दा महिलांनी प्रवेश केलेला आहे. तंत्रज्ञ, वाहक, चालक यासुद्धा महिला आहेत.

             एसटीचे खाजगीकरण, कंत्राटीकरण, तोट्याचे समीकरण, कामगारांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, अनियंत्रित कामाचे तास, वेळच्यावेळी पगार होणे, आगाराचे नुतनीकरण होणे, शासनाकडून अनुदान मिळणे अशा अनेक समस्यांनी एसटी त्रस्त आहे. एसटीलाही खंबीर नेतृत्व मिळाल्यास, आधुनिकीकरणाद्वारे, नविन तंत्रज्ञानाचा वापर करून, कमी देखभाल खर्च असलेल्या गाड्या वापरात आणल्यास तोट्यात जाणारी एसटी फायद्यात येऊ शकते. एसटीचा उपयोग काही प्रमाण बाजारपेठेसाठी एक वरदान होऊ शकेल. एसटी ही लालपरी केवळ स्थानिक दळणवळणाची सेवा उरता ग्रामीण विकासास चालना देणारी एक आदर्श व्यवस्था होऊ शकेल अशी आशा करुया.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव